कुपोषित बालकांसाठी डॉक्टर दांपत्याचा अनोखा उपक्रम

दीपक हीरे
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

वज्रेश्वरी : ठाणे जिल्हासह पालघर जिल्ह्यात कुपोषित बालके आढळून आल्याने सरकार खड़बडून जागे झाले आहे. मात्र आपल्याल्या समाजाचे काही देणे आहे या उद्देशाने भिवंडी तालुक्यातील अंबाडी या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नवजीवन रुग्णालय येथील डॉक्टर दाम्पत्य कुपोषित बालकाना शोधून त्यांना दत्तक घेत आहेत व त्यांची कुपोषणातून मुक्तता होइपर्यन्त देखभाल व उपचार कारित आहेत. त्यांच्या या उपक्रम बद्दल सर्वत्र कौतक होत आहे.

ठाणे जिल्हासह पालघर येथे ग्रामीण भागात अजूनही मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित कुपोषित बालके आढळून येत आहे. मात्र प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने ही बालके अद्याप उपचाराअभवी यातना भोगत आहेत. मात्र अम्बाड़ी येथील नवजीवन रुग्णालय येथील डॉ विनय पाटील व त्यांच्या पत्नी डॉ वर्षा पाटील कुपोषित बालकासाठी रात्र दिवस मेहनत घेत, त्यांना सुदृढ़ करीत आहेत. अंगणवाडी सेविका व बाल विकास केंद्र यांच्यामार्फत हे दाम्पत्य कुपोषित बालकांची माहिती घेउन त्यांच्या घरी जाउन सदर बालक दत्तक घेत आहेत व त्यांच्यावर अम्बाडी येथे आपल्या रुग्णालयात कुठलाही फी न घेता पूर्ण इलाज करीत आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून या डॉक्टर जोडप्याने वाड़ा येथील ग्रामीण खेड़े पाड्यातील 200 हून अधिक कुपोषित बलके सुदृढ केली आहेत. अम्बाडी येथील नवजीवन या रुग्णालयात हे दाम्पत्य कुपोषित बालकांसाठी विशेष औषध पुरवठा, सकस आहार देऊन त्यांची नियमित तपासणी करीत आहे. त्यासाठी येणारा सर्व खर्च हे दाम्पत्य स्वताच्या मेहनतिच्या कमाईमधून खर्च करीत आहे. त्यामुळे या परिसरात त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे

"समाजाला आपल्याला काही देणे आहे. समाज कार्याची आवड़ फक्त या उद्देशाने आम्ही कुपोषित बालकांवर उपचार करतो. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून आम्ही समाधानी होत असल्याची,' प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली परिसरात अशी बालके आढळल्यास  त्यांनी त्वरित संपर्क साधा, असे आवाहन हे दाम्पत्य करीत आहेत.