ठाणे कारागृहात चिनी कैद्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

ठाणे - हिरेचोरीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या चीनमधील नागरिकाचा ठाणे मध्यवर्ती कारागृहात 29 ऑगस्टला मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने मृत्यू झाल्याची शक्‍यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

जियांग चांगकिंग (वय 48) असे मृत आरोपीचे नाव आहे. कारागृहात 29 ऑगस्टला सकाळी जियांग जेवणासाठी रांगेत उभा होता. त्या वेळी अचानक कोसळला. त्याला रुग्णालयात हलवले; परंतु तेथे डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूची बातमी ठाणे पोलिसांनी चीनच्या दूतावासाला दिल्यानंतर नातेवाईक येईपर्यंत शवविच्छेदन करू नये, अशी विनंती दूतावासाने केली. त्यानुसार त्याचा मृतदेह जे. जे. रुग्णालयात ठेवण्यात आला होता. अखेर शवविच्छेदनानंतर बुधवारी (ता. 6) त्याचा मृतदेह नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात आला.

टॅग्स