ठाणे स्थानकात स्वच्छतेची लगबग 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

ठाणे -  ठाणे रेल्वेस्थानकाचा देशातील अस्वच्छ रेल्वेस्थानकांमध्ये आठवा क्रमांक आल्यानंतर सर्वच स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत "सकाळ'मध्ये छायाचित्रासह सविस्तर बातमी प्रसिद्ध होताच स्थानकात स्वच्छतेची लगबग सुरू आहे. चार ते पाच दिवसांपासून येथील फलाटांवरील कचरा गायब असल्याचे दिसत आहे. तसेच रेल्वेच्या इमारतीला रंगकाम करण्यासही सुरुवात करण्यात आली आहे. 

शंभरातील रेल्वेस्थानकांच्या स्वच्छतेचा आढावा नुकताच रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या सर्वेक्षणात ठाणे रेल्वेस्थानकाचा सर्वाधिक अस्वच्छ म्हणून आठवा क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे रेल्वेस्थानकातील अस्वच्छतेचा प्रश्‍न समोर आला. त्यातच या रेल्वेस्थानकात गेल्या सहा महिन्यांपासून कंत्राटदाराच मिळाला नसल्याचे समोर आले आहे. या रेल्वेस्थानकात रोज वेतनावर काम करणारे कामगार स्वच्छता करत आहेत. त्यांना रोज रोजंदारी दिली जात आहे; मात्र अस्वच्छतेच्या यादीत स्थानकाचे नाव आल्यानंतर येथील अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. नाव जाहीर होताच येथील अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे. स्थानकातील स्वच्छ-अस्वच्छ जागांची छायाचित्रे मध्य रेल्वेकडे पाठवण्यात आली आहेत. स्थानकाची स्वच्छता करण्यास सुरुवात झाली आहे. सध्या येथे रंगकाम सुरू आहे. तसेच पंख्यांची साफसफाई सुरू आहे. कचराही आता फलाटावरून गायब झाला आहे. यासंबंधी प्रवाशांना विचारणा केली असता ठाणे रेल्वेस्थानक देशात आठव्या क्रमांकावर असू शकत नाही. इतकेही वाईट हे स्थानक नसल्याचे प्रवासी सांगत असून, सर्वेक्षणाविषयी काही प्रवाशांमध्ये नाराजी दिसत आहे. 

Web Title: thane news Cleanliness process in Thane station