दाऊद टोळीचा हस्तक छोटा शकीलच्या संपर्कात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

ठाणे - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक फारुख मन्सूर याचा भाऊ आणि "डी कंपनी'चा प्रमुख हस्तक मानल्या जाणाऱ्या अहमद लंगडा याची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. त्याने इक्‍बाल कासकर बरोबर कोणताही संबंध नसल्याचा दावा केला; मात्र छोटा शकीलशी संपर्कात असल्याचे त्याने कबूल केले.

लंगडा याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने सोमवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप नसल्यामुळे चौकशी करून त्याला सोडून देण्यात आले; मात्र त्याला पुन्हा आज बोलाविण्यात आले होते. इक्‍बाल याच्या नशेखोरीमुळे आपला संपर्क नव्हता; परंतु पाकिस्तानमधील छोटा शकील याच्याबरोबर अधूनमधून बोलणे होत असल्याची कबुली लंगडा याने अधिकाऱ्यांना दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी मंगळवारी "ईडी'कडूनही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लंगडा हा 2003 पासून "डी कंपनी'चे काम सोडल्याचे पोलिसांना सांगत असला, तरी तो अधूनमधून छोटा शकीलशी संपर्कात असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स