विवाहइच्छुक महिलांची लूटकरणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

ठाणे - ठाण्यातील वागळे इस्टेट पोलिस ठाणे परिसरात राहणाऱ्या एका ३६ वर्षीय महिलेशी मॅट्रीमोनी संकेतस्थळावरून संपर्क करून त्याच्याकडून एक लाख ५७ हजारांची रक्कम लुटणाऱ्या नायजेरियन तरुणास ठाणे पोलिसांनी अटक केली. त्याची खरी ओळख अद्याप पटली नसून त्याच्याकडे रिपब्लिक ऑफ निंबिया, दोन साऊथ आफ्रिकन देशांचे पासपोर्ट आणि ६६ हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याचे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी सांगितले.

भारत मॅट्रीमोनी संकेतस्थळावर ३६ वर्षीय विवाहेच्छुक महिलेशी नायजेरियन तरुणाने दिनेश चेवन या खोट्या नावाने सोशल साईटस्‌द्वारे संपर्क केला. या महिलेशी वारंवार संवाद साधून तिला लग्नासाठी गळ घातली. तिचा विश्‍वास संपादन करून एक लाख ५७ हजारांची मागणी केली. ती बॅंक खात्यावर तत्काळ भरायला सांगितले. त्यानंतर मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत नायजेरियन तरुणास अटक केली. या व्यक्तीकडून एक लॅपटॉप, पाच मोबाईल फोन, एक मॉडेम, तीन सीम कार्ड, दोन विविध बॅंकेचे एटीएम कार्ड, तीन पासपोर्ट आणि ६६ हजारांची रक्‍कम जप्त केली. या आरोपीने आणखी दोन महिलांच्या फसवणुकीचे प्रयत्न सुरू केले होते, असेही पोलिस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी सांगितले.

Web Title: thane news crime