बेकायदा दुकानांवर  दिव्यात कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

दिवा -  दिवा रेल्वेस्थानक परिसराकील बेकायदा दुकाने आणि स्टॉल रविवारी (ता. ३) रेल्वेने जमीनदोस्त केले. पूर्व व पश्‍चिम अशी दोन्ही बाजूंना कारवाई करण्यात आली. दिवा-पश्‍चिमेला रेल्वेस्थानकाच्या जवळ असलेली वडापावची तीन दुकाने, दूध डेअरी, दोन पान टपऱ्या, चिकन-मटणची दोन, चहा-कॉफीच्या दोन दुकानांसह लॉटरीच्या दुकानावर रेल्वेने कारवाई केली. पूर्वेला असलेली मच्छी, चिकन-मटणची पाच ते सहा दुकाने तोडण्यात आली. कारवाईनंतर तोडण्यात आलेल्या दुकानांचे डेब्रिज लवकरच उचलण्यात येईल, असे रेल्वेने सांगितले.

दिवा -  दिवा रेल्वेस्थानक परिसराकील बेकायदा दुकाने आणि स्टॉल रविवारी (ता. ३) रेल्वेने जमीनदोस्त केले. पूर्व व पश्‍चिम अशी दोन्ही बाजूंना कारवाई करण्यात आली. दिवा-पश्‍चिमेला रेल्वेस्थानकाच्या जवळ असलेली वडापावची तीन दुकाने, दूध डेअरी, दोन पान टपऱ्या, चिकन-मटणची दोन, चहा-कॉफीच्या दोन दुकानांसह लॉटरीच्या दुकानावर रेल्वेने कारवाई केली. पूर्वेला असलेली मच्छी, चिकन-मटणची पाच ते सहा दुकाने तोडण्यात आली. कारवाईनंतर तोडण्यात आलेल्या दुकानांचे डेब्रिज लवकरच उचलण्यात येईल, असे रेल्वेने सांगितले. कारवाईदरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वेकडून जादा पोलिस बळ मागण्यात आल्याने कारवाई व्यस्थित पार पडली. रेल्वेची कारवाई योग्यच असून हे आधीच केले पाहिजे होते. त्यानंतर आठवड्यात पुन्हा ही दुकाने उभी राहू नयेत यासाठी स्थानकाजवळ अधिकृत स्टॉल दिले पाहिजेत, असे मत संजय चौधरी, शशांक अहिरे यांनी व्यक्त केले. जागा सुरक्षित करण्यासाठी कारवाई केली आहे. दिवा-पश्‍चिमेला रेल्वेचे बांधकाम होणार असल्याने तेथीन दुकाने तोडण्यात आली, अशी माहिती कुर्ल्याचे सेक्‍शन इंजिनियर अशोक कुमार यांनी दिली. 

मुंबई

मुंबई - "फेमा' कायद्याचा भंग केल्याबाबत ईडीच्या नोटिशीनंतर बुधवारी अभिनेता शाहरूख व गौरी खान यांचे वकील अंतिम सुनावणीसाठी...

01.39 AM

मुंबई - शाळा व महाविद्यालयांकडून व्यावसायिक दराने वीजदर न आकारता घरगुती दर लावावेत, अशी मागणी शिक्षक परिषदेने सरकारकडे केली...

01.39 AM

दादर - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानचा एल्फिन्स्टनमधील सेनापती बापट मार्गावरील मीनाताई ठाकरे मच्छीमार्केटच्या परिसरात...

01.30 AM