इक्‍बाल इब्राहिम कासकरला अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

ठाणे - ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्‍बाल इब्राहिम कासकर यास सोमवारी रात्री अटक केली. त्याच्या नागपाडा येथील राहत्या घरामध्ये त्याला अटक करण्यात आली. ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी ही कारवाई केली. ठाण्यातील एका विकसकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी ही कारवाई केली. अन्य तीन जणांनाही अटक करण्यात आल्याची माहिती मिळत असली, तरी पोलिसांकडून याविषयी कोणत्याही अधिकृत माहिती दिली नाही. 

Web Title: thane news Iqbal Ibrahim Kaskar arrested

टॅग्स