कल्याणमधील मुजोर रिक्षाचालकांविरोधात संयुक्त कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

कल्याण - कल्याण शिळ फाट्यावरील टाटा पॉवरजवळ रविवारी (ता. १८) अल्पवयीन विद्यार्थिनीचा रिक्षात विनयभंग झाल्याच्या प्रकरणाची दखल घेत आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्‍तरीत्या कारवाई सुरू केली असून आतापर्यंत कारवाईत तीन रिक्षा जप्त केल्या आहेत. 

या घटनेमुळे परिसरातील महिलांच्या सुरक्षेविषयक प्रश्‍न निर्माण झाला आहे. कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे आणि वाहतूक शाखेचे साहायक पोलिस आयुक्त बाबाजी आव्हाड यांच्या आदेशानुसार आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक दत्तात्रय लाड, सुभाष धोंडे,

अनुज भामरे, सहायक मोटार वाहन निरीक्षक जयेश देवरे; तर डोंबिवली वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गोविंद गंभिरे, हेमलता शेरेकर यांच्या पथकाने डोंबिवली आणि कल्याण शिळफाटा रस्त्यावर बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. यात विनापरवाना रिक्षाचालक, बॅच नसणारे, प्रवासी भाडे नाकारणारे यांसारख्या ४९ रिक्षाचालकांविरोधात करावाई केली. त्यापैकी १६ वर्षांपेक्षा जास्त वापरलेल्या तीन रिक्षा जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहेत, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली. यात लायसन्स नसणे, बॅज नसणे, भाडे नाकारल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. 

रिक्षा चालकांचा सर्वसामान्यांना सतत जाच सहन करावा लागतो. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा चालक रस्ता आंदण घेतल्याप्रमाणे वागतात. मनाला वाटेल तशा रिक्षा लावल्याने प्रवाशांना स्थानकात येणे-जाणे शक्य होत नाही. रिक्षा रस्त्यातून बाजूला करायला सांगितल्यानंतर रिक्षावाल्यांकडून अपशब्द ऐकून घ्यावे लागतात. घाईची वेळ असल्याने अनेकजण वाद टाळून लोकल पकडण्यासाठी निघून जातात.

रिक्षाचालक-मालक संघटनेची बैठक 
कल्याण वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी रिक्षा संघटना सदस्यांना एक फॉर्म  दिला असून त्यात प्रत्येक रिक्षाचालकाने आपली माहिती रिक्षामध्ये लावणे आवश्‍यक आहे. शहरातील सर्व रिक्षाचालकांना हे फॉर्म सक्तीचे करण्यासाठी विशेष मोहीम घेण्यात येणार आहे. 

ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार असून पुढील आदेश येईपर्यंत मोहीम सुरू राहणार आहे. त्यामुळे शहरातील रिक्षाचालकांनी रिक्षाची आवश्‍यक कागदपत्रे सोबत ठेवावीत.
- संजय ससाणे,  कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.