कल्याण रेल्वेस्थानक झाले चकाचक

कल्याण रेल्वेस्थानक झाले चकाचक

कल्याण - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार प्रत्येक रेल्वेस्थानक परिसरात बुधवारपासून (ता.१६) ते ३१ ऑगस्टदरम्यान स्वच्छ भारत स्वच्छ रेल्वे अभियान राबविण्यात येणार असून, बुधवारी (ता. १६) कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कल्याण रेल्वेस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

कल्याण रेल्वेस्थानक परिसरात स्थानक ते सिद्धार्थनगर स्कायवॉक, कल्याण पश्‍चिममधील स्कायवॉक आणि रेल्वेस्थानकातील फलाटावरील कचरा या वेळी उचलण्यात आला. या वेळी पालिका अधिकारी, रेल्वे अधिकारी यांना आमदार गायकवाड यांनी स्वच्छतेबाबत सूचना दिल्या. अभियानात भाजप ठाणे पालघर विभाग सचिव नाना सूर्यवंशी, संजय मोरे, परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता. स्कायवॉकवरील अभियानामुळे फेरीवाल्यांची चांगलीच तारांबळ उडाली. काही भाजीवाल्यांनी माल तसाच सोडून पळ काढला.

आज कल्याण रेल्वेस्थानक आणि स्कायवॉक परिसराची स्वच्छता अभियानांतर्गत साफसफाई करण्यात आली. स्कायवॉकवरील सुरक्षा आणि स्वच्छतेच्या प्रश्‍नावर लवकरच रेल्वे अधिकारी आणि पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तोडगा काढला जाईल. 
- गणपत गायकवाड, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com