ठाण्यात रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा रिक्षाच्या धडकेत मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

ठाणे - ठाण्यातील कॅडबरी बोगद्यासमोरील महामार्गावर रस्ता ओलांडत असलेल्या 55 वर्षीय व्यक्तीला भरधाव रिक्षाने ठोकर देऊन अपघात केला. या अपघातामध्ये डोक्‍याला गंभीर दुखापत झालेले शिवराम गायकवाड (55) हे जेष्ठ नागरिक उपचारा दरम्यान मृत्यूमुखी पडले.

या प्रकरणी त्याच्या मुलाने राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सुरेश हरिप्रसाद तिवारी असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. यावेळी रिक्षात असलेली एक महिला भारती कडू यादेखील या अपघातामध्ये जखमी झाले असून या प्रकऱणी रिक्षाचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राबोडी पोलीसांकडून देण्यात आली.

शांताराम गायकवाड लक्ष्मीचिराग नगर या भागामधील घमेंडी चाळीमध्ये राहतात. त्यांच्या घरामध्ये पत्नी दोन मुलगे आणि एक मुलगी असा कूटुंब असून शनिवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ते ठाण्यातील कॅडबरी बोगद्याच्या परिसरात रस्ता ओलांडत होते. त्यावेळी अत्यंत निष्काळजीपणे, वाहतुक नियमांचा भंग करून भरधाव वेगाने रिक्षा चालवणाऱ्या सुरेश तिवारी याने शिवराम यांना जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली तर रिक्षा ही उलटली होती. या घटनेची माहिती मिळताच शिवराम यांचा मुलगा चेतन (21) याने घटनास्थळी जाऊन वडीलांना तात्काळ रिक्षात घालून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथील डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी रिक्षा चालकाविरूध्द गुन्हा दाखल कऱण्यात आल्याची माहिती राबोडी पोलीसांकडून देण्यात आली.