ठाणे : अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर मार्शलचा बडगा

Thane news Marathi news cleanliness drive in Thane municipal
Thane news Marathi news cleanliness drive in Thane municipal

ठाणे : शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना करत असतानाच शहर अस्वच्छ करताना कोणी नागरिक आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यासाठी महापालिकेकडून मार्शलची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच या मार्शलला दहा रुपयांपासून 20 हजार रुपये दंडात्मक कारवाईचे अधिकार दिले जाणार आहे. विशेष म्हणजे या योजनेला सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी ठाण्यात होणार असून पुढील सर्वसाधारण सभेत याबाबतचा ठराव सादर होणार आहे. 

शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेकडून नियमित नियमांना अनुसरून उपविधी तयार करण्यात आला आहे. 2012 मध्ये उपविधी तयार करण्यात आला असून त्याला राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिकांना वचक बसवण्यासाठी शहरात 245 सफाई मार्शलची नियुक्ती करण्यात येणार आहे. 

शहर अस्वच्छ करणाऱ्या व्यक्तींकडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली असली, तरी या नवीन दरवाढीला सरकारची मंजुरी मिळाली नव्हती. आता त्याला मंजुरी मिळाली असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. शहरात दररोज 700 मेट्रिक टन कचरा निर्माण होत असून हा कचरा गोळा करण्यासाठी पालिकेजवळ 150 घंटागाड्या आहेत. पाच वर्षांपूर्वी शहरात 500 पेक्षा अधिक कचरा टाकण्याची ठिकाणे होती. हे प्रमाण 150 वर आले असले, तरी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांची संख्या; मात्र कमी झालेली नाही. केवळ उघड्यावर कचरा टाकणे इथपर्यंत हे प्रमाण मर्यादित नसून रस्त्यांवर थुंकणे, आंघोळ करणे, इमारतीची मलवाहिनी अथवा जलवाहिनी फुटणे, इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंच्या कचऱ्याचे विभक्तीकरण करणे, अशा अनेक गोष्टींचे पालन न केल्यास पालिकेकडून 2005 पासून दंड वसूल करण्यात येत आहे. त्यानंतर 2012 मध्ये तयार करण्यात आलेल्या उपविधीमध्ये नवीन दर निश्‍चित करण्यात आले आहेत. यामध्ये 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. काही प्रकारांमध्ये तर ही वाढ दुपटीने करण्यात आली आहे. त्यामुळे 100 रुपयांपासून 20 हजार रुपयांपर्यंत दंडाची रक्कम निश्‍चित करण्यात आली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com