ठाण्यात आयुक्तांकडून प्राधिकरणाची कानउघाडणी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

ठाणे - ठाणे महापालिकेतर्फे विविध प्राधिकरणाची विकासकामे सुरू आहेत. तेव्हा पावसाळा तोंडावर असताना अद्याप विकासकामांचा राडारोडा रस्तोरस्ती पडल्याने नागरिकांची वाट बिकट बनली. रस्तोरस्ती गाळ व भरावामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरल्याचे वृत्त दै. "सकाळ'मध्ये (ता. 3) प्रसिद्ध होताच ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी संबंधित प्राधिकरणाची कानउघाडणी करून तत्काळ कामे थांबवण्याचे आदेश दिले. तसेच खोदकाम सुरू राहिल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. 

ठाणे महापालिका क्षेत्रात नागरिकांच्या सुविधेसाठी अनेक सेवा रस्त्यांसह उड्डाणपूल आणि पादचारी पुलांचे काम सुरू आहे. सरकारी निर्देशानुसार सर्व विकासकामे अथवा खोदकामे 31 मेपूर्वी आटोपती घेण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार पालिकेने ठेकेदारांना बजावलेही होते. तरीही नौपाडा, हरी निवास सर्कल येथे, तसेच माजिवडा नाका या ठिकाणी उड्डाणपुलांची कामे आणि वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीकडून भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी रस्त्यांचे खोदकाम सुरू असल्याने रस्त्यांना अवकळा आली असून, आधीच तोकड्या असलेल्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. याशिवाय पावसाळ्यापूर्वी सुरू असलेली नालेसफाई अद्याप पूर्ण झालेली नसल्याने शहराच्या अनेक भागांतील नाले आणि गटारांमधील कचरा व घाण काढून रस्त्यावर टाकण्यात आले आहे. या घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला असून, शहरभर दुर्गंधी पसरली आहे. कोपरीसह अनेक ठिकाणी मलनि:सारण वाहिन्या बाधित झाल्याने घाण पाणी रस्त्यांवर वाहत असल्याने विविध आजारांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत होती. या पार्श्‍वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत आयुक्तांनी महावितरणकडून खोदण्यात आलेल्या खड्ड्यांबाबत नाराजी दर्शवून पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचा धोका नको, असे स्पष्ट करत सर्व कामे तत्काळ थांबवण्याचे आदेश दिले. 

खोदकामामुळे रस्त्यांवर खड्डे 
ठाणे महापालिका परिसरात महावितरण, रिलायन्स, तसेच अन्य मोबाईल कंपन्यांच्या केबल टाकण्याची कामे सुरू असून, त्यासाठीच्या खोदकामामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या प्राधिकरणाच्या अनामत रक्कमेतून पालिकेद्वारे खड्डे बुजवण्याची मोहीम सुरू आहे; मात्र पालिकेची परवानगी न घेता खड्डा खोदल्यास दंड आकारण्याची तरतूदही आहे. आता पावसाळा तोंडावर असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने सर्वच प्राधिकरणांना तंबी दिली.