वेश्‍याव्यवसाय चालविणाऱ्या महिला दलालास ठाण्यात अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

ठाणे - वेश्‍याव्यवसाय चालविणाऱ्या एका महिला दलालास मंगळवारी पोलिसांनी अटक केली. भावना कोटीयन (वय 21) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. वागळे इस्टेट परिसरात एका महिलेकडून वेश्‍याव्यवसाय चालविला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती.

त्यावरून त्यांनी तीन हात नाका येथील मॉलसमोर छापा टाकून भावना हिला ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी तिच्याकडून 13 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन पीडित महिलांची सुटका केली आहे.