ठाण्याच्या रहिवाशांना नाहक दुरुस्तीचा भुर्दण्ड; दामिनीचा झटका

दिनेश चिलप मराठे
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

  • घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू झाल्या निकामी
  • मुसळधार पाऊस आणि विजेच्या कडकडाडाचा गृहिनींनी घेतला धसका

मुंबईः ठाण्यात गेल्या शुक्रवार पासून दिवसाआड संध्याकाळी पडणाऱ्या पावसाने आणि कडकडणाऱ्या दामिनी मुळे खारेगाव, पारसीक नगर, सह्याद्री, मनीषा नगर, शास्त्री नगर जानकी नगर येथील रहिवाशांना घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू अचानक निकामी झाल्याने दुरुस्तीचा नाहक भुर्दण्ड सोसावा लागत असून, या विजेचा (दामिनीचा) गृहिणींनी धसका घेतला आहे.

या संदर्भात कळवा खारेगाव येथील नामदेव अपार्टमेंट मधील राहिवाशी श्रीमती प्रमिला सत्पाल शर्मा यांच्या घरातील फ्रिज अचानक बंद झाला. फ्रिज टेक्नीशियन यांना घरी बोलावले असता तेंव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि काळजीही वाटू लागली. त्याला कारणही घडले ते पावसाचे आणि विजेचे विशेषतः आकाशातील विजेच्या झगमटाने कोसळणाऱ्या विजेच्या आवाजाने-नैसर्गिक विज लहरीने फ्रिज बंद पडला. त्याचा नाहक दुरुस्ती खर्च येणार असून, हा नाहक भुर्दंड बसला आहे. अशा 50 ते 60 तक्रारी मी सकाळ पासून प्रत्यक्ष पहात आहे, असे टेक्नीशयन गंगाराम दाते यांनी राजीव शर्मा आणि संगीता शर्मा यांना सांगितले.

पावसात आपल्या घरातील इलेक्ट्रोनिक्स वस्तू असलेले टीव्ही, रेफ्रिजरेटर, लॅपटॉप, कॉम्पुटर, स्मार्ट टीव्ही, वॉटर प्यूरीफायर आदी वस्तूंचे कनेक्शन बंद ठेवावेत. विजेमुळे होणाऱ्या वीज इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे रक्षण करावे, असे आवाहन राजीव शर्मा यांनी लोकांना केलेले आहे.