रमजान ईद ठाण्यात उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

ठाणे - चंद्रदर्शन झाल्यानंतर सोमवारी (ता.२६) ठाण्यात ईद उत्साहात साजरी झाली. शहरातील सर्व मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी गर्दी केल्याने रस्ते गजबजून गेले होते. 

ठाणे - चंद्रदर्शन झाल्यानंतर सोमवारी (ता.२६) ठाण्यात ईद उत्साहात साजरी झाली. शहरातील सर्व मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी गर्दी केल्याने रस्ते गजबजून गेले होते. 

नित्याप्रमाणे पहाटे विविध मशिदींमधून नमाज अदा करण्यात आला. ठाण्यातील चरई यथील इदगाह कम्पाऊंड येथे हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. शहरातील महागिरी येथील जुम्मा मशीद, राबोडीतील नूर मशीद, जुम्मा मशीद, हाजुरीतील मशीद, कळव्यातील जुला मशीद, कापूरबावडी, वागळे येथील इंदिरानगर, शांतीनगर, हनुमाननगर येथील मशीद, मुंब्य्रातील दारूल फलाई; तर कासारवडवलीतील जामा मशीद अशा विविध मशिदींमध्ये नमाज अदा करण्यात आला.