बलात्कार प्रकरणातील आरोपी 15 वर्षांनी जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

ठाणे - गुजरातेतील बलात्कार प्रकरणात तब्बल 15 वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. वीरेंदर ऊर्फ उरुमिया बहादूर शेतवाली (रा. कोलबारी, नेपाळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

ठाणे - गुजरातेतील बलात्कार प्रकरणात तब्बल 15 वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. वीरेंदर ऊर्फ उरुमिया बहादूर शेतवाली (रा. कोलबारी, नेपाळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गुजरातेत 2002 मध्ये झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी वीरेंदर याला फरारी घोषित करण्यात आले होते. त्याच्या शोधासाठी पोलिस पथक ठाण्यात आले होते. ठाण्याच्या हिरानंदानी मिडोस येथे तो बांधकाम साईटवर असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. त्याला गुजरात पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले, अशी माहिती पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली.