फेसबुकवरून मैत्री करून तरुणीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

ठाणे - मुंबईतील जेकब सर्कल परिसरातील एका 26 वर्षीय तरुणीबरोबर मैत्री करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे - मुंबईतील जेकब सर्कल परिसरातील एका 26 वर्षीय तरुणीबरोबर मैत्री करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साहील खान (वय 30) असे आरोपीचे नाव आहे. तो मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सनजीकच्या लोटस कॉलनी येथील रहिवासी आहे. त्याची एका तरुणीबरोबर फेसबुकवर मैत्री झाली होती. त्याने घरच्यांशी ओळख करण्याचा बहाणा करीत तरुणीला मुंब्रा येथे आणले. त्यानंतर शीळफाटा येथील गेस्ट हाउसमध्ये तिच्यावर बलात्कार केला. या तरुणीने शीळ-डायघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला.