ठाण्यात बिबट्याची कातडी विकणाऱ्यास अटक; कातडे हस्तगत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

ठाणे : नाशिकच्या पेठा तालुक्यातील करंजाळी येथून बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेल्या एका 59 वर्षीय व्यक्तीला ठाणे पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. रामचंद्र एकनाथ भुसारे (59) असे या व्यक्तीचे नाव आहे. आंतराष्ट्रीय बाजारामध्ये या कातड्याची किंमत साधारण 40 लाख रुपये आहे. 50 हजार रुपये किंमतीमध्ये हे कातडे विकण्यासाठी भुसारे प्रयत्न करत होता. पोलीसांनी ही कातडी वनविभागास दाखवून त्यांच्याकडून त्याची खात्री करून घेतली आहे. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिबट्याची कातडी विक्री करण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या जवळ सॅटीस पुलाखाली एक व्यक्ती येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा घटक एक चे सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीशैल चिवडाशेट्टी यांना मिळाली होती. गुरूवारी सकाळी पोलीसांनी या भागामध्ये सापळा रचून यातील आरोपी रामचंद्र भुसारे यांना अटक केली. त्यांच्याकडून 50 हजार रुपये किंमतीची बिबट्याची कातडी हस्तगत केली. हे कातडे वन्यजिव गुन्हे नियंत्रण विभागाच्या निरिक्षकांना दाखवून त्याची खात्री करण्यात आली. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बिबट्याची शिकार करणाऱ्यांच्या शोधात पोलीस असून याविषयी पुढील तपास केला जाणार आहे, अशी माहिती पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अभिषेक त्रिमुखे यांनी दिली.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

टॅग्स