एसटीच्या परीक्षेला सर्व्हर डाउनचा फटका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

ठाणे - महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) लिपिकपदांसाठी खातेअंतर्गत कामगार भरती परीक्षेला सर्व्हर डाउनचा फटका बसला. वेळापत्रकानुसार सकाळी दहा वाजता सुरू होणारा पेपर सुरू न झाल्यामुळे परीक्षार्थींनी केंद्रावर गोंधळ घातला. अखेर तब्बल सात तासांनंतर परीक्षा पुन्हा सुरू झाली.

कासारवडवली येथील एमबीसी पार्क येथे लिपिकपदांसाठी आज बुधवारी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार होती. सकाळी 10 ते एक आणि दुपारी तीन ते सहा या दोन सत्रांत होणार होती. या परीक्षेसाठी पालघर जिल्ह्यातून 100 व ठाणे जिल्ह्यातून 350 परीक्षार्थी ठाणे येथे आले होते. सकाळी दहा वाजताचा पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळात सर्व्हर डाउन झाला. त्यामुळे परीक्षा थांबविण्यात आली. दुपारी 12 वाजले तरी सर्व्हर सुरळीत नसल्याने परीक्षार्थींनी गोंधळ घातला. या काळात परीक्षार्थी उन्हात ताटकळत उभे होते. अखेर एसटीचे विभाग नियंत्रक अविनाश पाटील व इतर अधिकाऱ्यांनी केंद्रावर धाव घेत परीक्षार्थींना शांत केले. त्याचबरोबर तेथील केंद्र रद्द करून ज्ञानगंगा महाविद्यालयात परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर एसटी बसेसमधून विद्यार्थ्यांना ज्ञानगंगा महाविद्यालयात नेण्यात आले. तेथे सायंकाळी पाच वाजता परीक्षा घेण्यास सुरवात करण्यात आली.

Web Title: thane news st exam server down