ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा कहर

ठाणे जिल्ह्यात  स्वाईन फ्लूचा कहर

ठाणे - जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा कहर सुरूच असून, पंधरवड्यात आजाराला बळी पडलेल्यांची संख्या दुपटीने वाढल्याचे समोर आले आहे. संपूर्ण कोकण परिक्षेत्रात जूनअखेरीस स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या १४ होती, तर आता एकट्या ठाणे जिल्ह्यातच बळी पडलेल्यांची संख्या तब्बल २१ झाल्याची माहिती जिल्हा सरकारी रुग्णालयाने दिली. दिल्लीच्या पथकाने केलेल्या पाहणीच्या फार्सनंतर तसेच स्वाईन फ्लू आटोक्‍यात आणण्यासाठी बनवलेली कृती योजनाही फोल ठरली आहे.

जिल्ह्यात स्वाईन फ्लू आटोक्‍यात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. जानेवारी ते जुलै (ता. १४ पर्यंत) स्वाईन फ्लूच्या रुग्णांचा आकडा दुपटीपेक्षा वाढला आहे. जूनअखेरीस ठाणे महापालिका क्षेत्रात सात व इतर ठिकाणचे दोन असे नऊ रुग्ण दगावल्यानंतर महापालिकेने स्वाईन फ्लूच्या उपचारांसाठी कृती योजना तयार केली होती, तर या आजाराची व्याप्ती वाढत असल्याने केंद्राने तातडीने दखल घेऊन स्वाईन फ्लूच्या प्रादुर्भावाची कारणे शोधण्यासाठी दिल्लीतील नॅशनल सेंट्रल फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी)कडून पाहणी केली होती. जिल्हा सरकारी रुग्णालयाकडील आकडेवारीनुसार ठाणे पालिका क्षेत्रात आतापर्यंत ११ बळी, कल्याण क्षेत्रात पाच, नवी मुंबई परिसरात एक आणि मिरा-भाईंदर भागात चार असे जिल्ह्यात एकूण २१ रुग्ण स्वाईन फ्लूने दगावले आहेत. 

जानेवारी ते जुलैपर्यंत (ता. १४ जुलैपर्यंत) ५१९ संशयित रुग्ण आढळले असून, यातील ४३५ जणांना लागण झाली आहे. २४० जणांवर उपचार करून सोडण्यात आले. या रुग्णांपैकी सात रुग्ण अत्यवस्थ स्थितीत असून, एक जण ठाणे सिव्हील रुग्णालयात दाखल आहे. 

योजना ढेपाळली
जानेवारी ते जून २०१७ पर्यंत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या कोकण विभागात स्वाईन फ्लूने १४ रुग्ण दगावले होते. हे सर्व मृत्यू जून महिन्यातच झाल्याने केंद्राचे पथक पाहणीसाठी आले होते, तर आता जुलैमध्ये स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या वाढून एकट्या ठाणे जिल्ह्यातच २१ जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य प्रशासनाची कृती योजना ढेपाळल्याचे दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com