नोटबंदी यशस्वी; उद्योगांची भरभराट : मुख्यमंत्री

श्रीकांत सावंत
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

ठाणे : एका वर्षांपुर्वी याच दिवशी देशामध्ये डिजीटल अर्थव्यवस्थेची सुरूवात झाली असून, निश्चलिकरणामुळे देशाचा प्रवास डिजिटल रिस्पॉन्सिबल अर्थव्यवस्थेच्या दिशेने सुरू झाला आहे, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यामध्ये व्यक्त केले.

ठाणे : एका वर्षांपुर्वी याच दिवशी देशामध्ये डिजीटल अर्थव्यवस्थेची सुरूवात झाली असून, निश्चलिकरणामुळे देशाचा प्रवास डिजिटल रिस्पॉन्सिबल अर्थव्यवस्थेच्या दिशेने सुरू झाला आहे, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यामध्ये व्यक्त केले.

ठाणे येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसच्या शुभारंभासाठी ठाण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी नोटबंदीच्या वर्षपुर्तीचे कौतुक करून अर्थव्यवस्थेला वेग आला असून उद्योगांची भरभराट झाली असल्याचे सांगितले. त्यामुळे देशामध्ये मोठ्याप्रमाणामध्ये रोजगार निर्माण झाल्याचे त्यांनी सांगित ठाण्यातील या प्रकल्पामुळे सुमारे 30 हजार नागरिकांना रोजगार मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

ठाण्यातील घोडबंदर परिसरातील हिरानंदानी इस्टेटमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्सेसच्या ऑलम्पस सेंटरचे उद्घाटन आज (बुधवार) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी राज्यामध्ये सुरू असलेल्या उद्योगांच्या गुंतवणूकीचे कौतुक करून निश्चलिकरणाचा कोणताही विरित परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला नसल्याचे स्पष्ट केले. निश्चलिकरणावर टिका करणाऱ्यांनी देशातील उद्योगांकडून होणारी गुंतवणुक आणि वाढलेल्या रोजगार पाहण्याची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले.

स्टार्टअप्स कंपन्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असून, टाटा सारख्या नामांकित आणि विश्वासार्ह कंपन्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रात स्टार्ट अप्ससाठी पोषक वातावरण तयार करण्यात येईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. 19 लाख स्क्वेअर फुट जागेत विस्तारलेल्या या कार्यालयासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने गेल्या वर्षी हिरानंदानी यांच्याशी करार केला होता. याठिकाणी एकाचवेळी 30 हजार कर्मचारी काम करू शकतील अशी व्यवस्था इथे उभारण्यात आली आहे. टीसीएस आणि हिरानंदानी यांच्यात या जागेसाठी 15 वर्षांचा करार करण्यात आला आहे. याप्रसंगी टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रसेकरन यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र उद्योग क्षेत्रामध्ये अव्वल क्रमांकवर आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. 150 वर्षांपासून टाटा समूह हा विविध क्षेत्रात देशात कार्यरत असून त्याचे मूळ महाराष्ट्र आणि मुंबईत आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन, खासदार राजन विचारे, कपिल पाटील, आमदार संजय केळकर, प्रताप सरनाईक, गणपत गायकवाड, महापौर मीनाक्षी शिंदे, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, मनपा आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस आयुक्त परम बीर सिंह, निरंजन हिरानंदानी आदि मान्यवर उपस्थित होते.

पुणे ही देशातील स्टार्ट अप्सची राजधानी होणार...
देशातील 50 टक्के लोकसंख्या ही 25 वर्षाखालील असून ही तरुण पिढी तंत्रज्ञानात प्रगत आहे तसेच त्यांना नवीन उपक्रम सुरु करण्याची उर्मी आहे. त्यांना आता नोकऱ्या करण्यापेक्षा नोकऱ्या देणारे बनायचे आहे, त्यामुळे पुढील काळात स्टार्ट अप्सना उत्तेजन दिले जाईल असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पुणे ही देशातील स्टार्ट अप्स ची राजधानी होईल असा विश्वास व्यक्त केला. लवकरच राज्याचे फिनटेक धोरण ठरविण्यात टाटा सन्ससारख्या सक्षम कंपन्यांची मदत घेतली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. टाटा समूह नाशिक येथे सामाजिक जबाबदारीतून करीत असलेल्या उपक्रमांचीही मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली. तर यापुर्वी केवळ चीनमध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये मोठे इमारत प्रकल्प उभे राहिल्याचे पाहत असलो तरी टीसीएसचा हा प्रकल्पास आवश्यक परवानग्यांची प्रक्रीया अवघ्या पंधरा दिवसांत पुर्ण करण्यात आली असून 18 महिन्यांमध्ये हा अवाढव्य प्रकल्प उभा राहिला असून त्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले.
 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :