उपमहापौरांच्या नावाने दुकानदाराची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

कळवा - ठाण्याचे उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या नावाने मोबाईलवरून कॉल करून मुंब्रा येथील इलेक्‍ट्रॉनिक दुकानाच्या मालकाची एक लाख ४६ हजारांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी बुधवारी (ता. ३१) मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

कळवा - ठाण्याचे उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या नावाने मोबाईलवरून कॉल करून मुंब्रा येथील इलेक्‍ट्रॉनिक दुकानाच्या मालकाची एक लाख ४६ हजारांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी बुधवारी (ता. ३१) मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

आलमास कॉलनीत मुनाफ शेख यांचे इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचे दुकान आहे. मंगळवारी (ता. ३०) सायंकाळी ८७९३६२२७४१ या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. आपण ठाण्याचे उपमहापौर रमाकांत मढवी बोलत आहोत. ठाण्यातील नवीन कार्यालयासाठी तीन एसी व एक एलईडी टीव्ही पाठवून द्या. रात्री ८.३० वाजता दुकानात येऊन पैसे देतो, असे त्या व्यक्तीने सांगितले. त्यानुसार शेख यांनी टेम्पोतून ठाण्यातील कापूरबावडी परिसरात ३५ हजारांची एलईडी टीव्ही, ३७ हजार रुपये किमतीच्या तीन एसी पाठवून दिल्या. टेम्पोचालकाबरोबर दुकानात काम करणाऱ्या मुलाला पाठवले. मात्र, पैसे न मिळाल्याने रात्री शेख यांनी उपमहापौर मढवी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपण वस्तू मागवल्या नसल्याचे सांगितले. याप्रकरणी शेख यांनी मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस मोबाईल क्रमांकधारकाचा शोध घेत आहेत. 

मुंबई

तुर्भे  - दगडखाणींमुळे प्रदूषणात 10 टक्के वाढ होत असून त्यामुळे नागरिकांना श्‍वसनविकारांचा सामना करावा लागत आहे. याच...

05.33 AM

तुर्भे  - 17 वर्षांखालील फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धा जवळ आल्याने सायन-पनवेल महामार्गाच्या दुरुस्तीचे आणि सुशोभीकरणाचे...

05.03 AM

मुंबई -  अवजड वाहनांचा वापर करून कुलाबा-सीप्झदरम्यानच्या "मेट्रो-3' प्रकल्पाचे काम रात्रीच्या वेळेस करण्यास केलेली मनाई...

04.24 AM