ठाणे स्थानकात अस्वच्छता; चाकरमान्यांचे आरोग्य धोक्यात

दीपक शेलार
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी देशभरातील 16 रेल्वे झोनमधील रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेचा आढावा क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेमार्फत घेतला होता. या संस्थेच्या अहवालात वांद्रे स्थानक वगळता मध्य व पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील उपनगरीय स्थानकातील एकही स्थानकाचे नाव स्वच्छता यादीत आले नव्हते.

ठाणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत अभियान रेल्वे स्थानकामध्ये राबवण्यास सुरवात झाली. त्यानुसार,16 ते 31 ऑगस्ट या कालावधीत हे अभियान सुरु झाले असले तरी ही मोहिम दिखावू ठरली आहे. ठाणे रेल्वे स्थानकात सर्वत्र अस्वच्छतेचे पेव फुटलेले दिसून येते. वर्दळीचा असलेल्या फलाट क्रमांक 5 वर भंगाराचे साम्राज्य पसरल्याने चाकरमान्यांचे आरोग्य धोक्यात आले असुन फेरीवाल्यांच्या बजबजपुरीने प्रवाशी त्रस्त झाले आहेत.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी देशभरातील 16 रेल्वे झोनमधील रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेचा आढावा क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेमार्फत घेतला होता. या संस्थेच्या अहवालात वांद्रे स्थानक वगळता मध्य व पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील उपनगरीय स्थानकातील एकही स्थानकाचे नाव स्वच्छता यादीत आले नव्हते. या पार्श्वभूमीवर आता स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत अशी नवी टूम मोदी सरकारने काढली आहे. त्यानुसार,16 ऑगस्टपासून या अभियानाला प्रारंभ झाला मात्र ऐतिहासिक ठाणे स्थानकात स्वच्छतेच्या नावाखाली केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी दिखावु मोहीम राबवली जात आहे.

भितीपत्रके, रॅली व प्रवाश्यांना गुलाब पुष्प देवुन फोटोसेशन करण्याचा सपाटा रेल्वे प्रशासनाने लावला आहे.ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 5 व 6 वरून जलद लोकलसह लांबपल्याच्या गाड्यांची अहोरात्र ये जा सुरु असते. याच फलाटावर कोकणात जाणाऱ्या गाडया भांबत असल्याने चाकरमान्यांची तोबा गर्दी उसळते.मात्र,फलाटावर अंधाराचे साम्राज्य असुन ठाणे बोगीजवळ भंगार पत्र्यांचे ढीग रचल्याने चाकरमान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत स्टेशन मास्तर सुरेंद्र महिधर यांना वारंवार कळवुनही त्यांनी दुर्लक्ष केले आहे.खासदारांकडे तक्रार करावी का,असे विचारले असता त्यांनी खुशाल तक्रार करा, असे उद्धट उत्तर दिले. तेव्हा, आता प्रवाश्यांना वाली कोण असा सवाल उपस्थित होत आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :