किरकोळ भाजीविक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट

शर्मिला वाळुंज
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

ठाणे - ठाणे, कल्याण, डोंबिवली, तसेच आसपासच्या शहरांना भाजीपाल्याचा पुरवठा करणाऱ्या कल्याण कृषी उत्पन्न समितीत दोन दिवसांपासून आवक कमालीची वाढल्याने भाज्यांचे दर झपाट्याने उतरले आहेत; मात्र पितृपक्षात भाज्यांना वाढती मागणी असल्याने किरकोळ विक्रेत्यांनी दर चढेच ठेवले आहेत.

ठाणे - ठाणे, कल्याण, डोंबिवली, तसेच आसपासच्या शहरांना भाजीपाल्याचा पुरवठा करणाऱ्या कल्याण कृषी उत्पन्न समितीत दोन दिवसांपासून आवक कमालीची वाढल्याने भाज्यांचे दर झपाट्याने उतरले आहेत; मात्र पितृपक्षात भाज्यांना वाढती मागणी असल्याने किरकोळ विक्रेत्यांनी दर चढेच ठेवले आहेत.

मागील आठवड्यात ३४ रुपये किलो या दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोचे दर घाऊक बाजारात १५ रुपयांपर्यंत स्थिरावले आहेत. किरकोळ बाजारात टोमॅटो महागच आहे. गुरुवारी डोंबिवलीत टोमॅटो ५० रुपये किलो, तर ठाण्यातील गोखले रोडवरील बाजारात ४० रुपये किलो दराने विकला जात होता. कोबी, भेंडी, भोपळा, फ्लॉवर, वांगी, शिराळी, तोंडली, कारले, सुरण या भाज्यांचे दर १० ते २५ रुपये किलो असे आहेत; मात्र किरकोळ बाजारात याच भाज्यांचे दर ६० ते ८० रुपये किलो आहेत. गेल्या आठवड्यात ३४ किलो दराने विकला जाणारा वाटाणा या आठवड्यात मात्र महागला आहे. घाऊक बाजारातच वाटाणा ६० रुपये असल्याने किरकोळ बाजारात तो १५० रुपये किलो दराने विकला जात आहे.

पुणे तसेच नाशिक जिल्ह्यातून बुधवारी दिवसभरात १७५ गाड्यांची आवक झाली. भाज्यांची आवक वाढल्याने त्यांच्या दरात कमालीची घसरण झाली अाहे. 
- शामकांत चौधरी, सचिव, कल्याण 

मुंबई

मुंबई : खासगी व्यक्तींना पोलिस संरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने योजनेची फेरआखणी करावी, असे आदेश बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

कल्याणः मुसळधार पाऊस सुरू असताना आज (बुधवार) सकाळी शहाड रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे लोहमार्ग पोलिस आणि कल्याण...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

8 ते 10 कोटींचा व्यापार ठप्प मुंबईः भाद्रपद अमावस्या संपत आली असून, दक्षिण मुंबईतील हक्काची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेला...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017