नागरिकांना जेवढे फुकट मिळेल तेवढे पाहिजे असते: तावडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

कल्याण: "आम्हा राजकीय नेत्यांना सगळेच फुकट द्यायची सवय असते. नागरिकही जेवढे फुकट मिळेल तेवढे बरे याच मूडमध्ये असतात" असे वक्तव्य करून राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.

कल्याण: "आम्हा राजकीय नेत्यांना सगळेच फुकट द्यायची सवय असते. नागरिकही जेवढे फुकट मिळेल तेवढे बरे याच मूडमध्ये असतात" असे वक्तव्य करून राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.

कल्याण पश्चिमेचे भाजपाचे आमदार नरेंद्र पवार यांच्या निधीतून गोदरेज हिल परिसरात उद्यान साकारण्यात येत आहे. त्याचे भूमीपूजन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज (गुरुवार) करण्यात आले. त्यानंतर झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. उद्यानाचे उद्घाटन केल्यानंतर त्याच्या देखभालीच्या खर्चाबाबत आपल्याला नेहमी प्रश्न पडतो. कारण आम्हा राजकीय नेत्यांना सर्वच फुकट द्यायची सवय असते आणि नागरिकांनाही जितके फुकट मिळेल तेवढे बरे, असे सांगत तावडे यांनी शेतकरी कर्जमाफी आणि टोल नाक्याचे उदाहरण दिले. शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहीजे 22 हजार कोटींची, टोल-उपकर भरायचा नाही आणि लोकांना रस्ते तर चांगले पाहिजेत अशा सर्व अडथळ्यांमधून आम्ही अधिकाधिक सोयी सुविधा सामान्य माणसाला पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही तावडे यावेळी म्हणाले.

श्री कॉम्प्लेक्स परिसरातील तिर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी निसर्ग उद्यानाचे भूमीपूजनही तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला महापौर राजेंद्र देवळेकर, खासदार कपिल पाटील, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, उपमहापौर मोरेश्वर भोईर, शिक्षण मंडळ सभापती वैजयंती घोलप, माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर आदी उपस्थित होते.

मुंबई

तुर्भे  - दगडखाणींमुळे प्रदूषणात 10 टक्के वाढ होत असून त्यामुळे नागरिकांना श्‍वसनविकारांचा सामना करावा लागत आहे. याच...

05.33 AM

तुर्भे  - 17 वर्षांखालील फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धा जवळ आल्याने सायन-पनवेल महामार्गाच्या दुरुस्तीचे आणि सुशोभीकरणाचे...

05.03 AM

मुंबई -  अवजड वाहनांचा वापर करून कुलाबा-सीप्झदरम्यानच्या "मेट्रो-3' प्रकल्पाचे काम रात्रीच्या वेळेस करण्यास केलेली मनाई...

04.24 AM