'गुगल सर्च'वरून पकडला मोबाईल चोर

'गुगल सर्च'वरून पकडला मोबाईल चोर

मुंबई - मुंबईतील एका शिक्षिकेने गुगलचा वापर करून चोरीस गेलेला मोबाईल तर शोधून काढलाच; पण त्याचबरोबर चोरालाही पकडून दिल्याची आश्‍चर्यजनक घटना उघडकीस आली आहे. झीनत बानू हक असे या तरुणीचे नाव असून, ती अंधेरीतील मरोळ येथील रहिवासी आहे. वैयक्तिक कामानिमित्त झीनत मालाड येथे गेली होती, घरी परतल्यावर मात्र तिला आपला स्मार्टफोन गहाळ झाल्याचे लक्षात आले. तिने आपला फोन नेमका कोणाच्या ताब्यात आहे आणि संबंधित व्यक्ती त्यावर नेमकी काय सर्च करते आहे याचा शोध घ्यायचे ठरविले.

दुसऱ्याच्या हॅंडसेटमधून तिने गुगल अकाउंटमध्ये लॉगइन करून चोरी गेलेल्या फोनचे लोकेशन ऑन केले, तसेच, माय ऍक्‍टिव्हिटीमध्ये जाऊन तिने गुगलवर नेमका कशाचा शोध घेण्यात आला याचा मागोवा घेतला. मोबाईल चोरणाऱ्याने रजनीकांतच्या "काला' या सिनेमासाठी सर्च केले, त्याने "शेअरइट ऍप'च्या वापराबरोबरच व्हॉट्‌सऍप आणि फेसबुकही वापरल्याचे समजले. त्या चोराने दादर ते तिरुवनामलाई ट्रेनचे तिकीट बुक करून पीएनआर आणि स्वतःचाही फोटो काढल्याचे तिला दिसले. हा चोर रात्री साडेनऊ वाजता दादरवरून सुटणारी गाडी पकडणार असल्याची माहिती तिला मिळाली. झीनतने मग पोलिसांसमवेत दादर पोलिस स्टेशन गाठून संबंधित चोरालाही पकडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com