मुंबईत तीन मुलींना विष पाजून पित्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

मुंबई - कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने त्याच्या तीन मुलींना विष पाजून स्वत:ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी अंधेरीतील साकीनाका परिसरात घडली. मंगेश अणेराव (वय 40) असे या पित्याचे नाव आहे. घटनास्थळी पोलिसांना मंगेश याने लिहिलेली चिठ्ठी मिळाली आहे. आपल्या आत्महत्येस कुटुंबीय जबाबदार आहेत, असे या चिठ्ठीत नमूद केले आहे.

मंगेश हा पत्नी, तीन मुली आणि एका मुलासह साकीनाक्‍याच्या माहोली या बैठ्या चाळीत राहत होता. ती सदनिका मंगेशच्या वडिलांच्या नावावर होती. त्यावरून अणेराव कुटुंबीयांमध्ये वाद सुरू होता. मंगेश हा बेरोजगार असल्याने तो नैराश्‍यात होता. त्याने शनिवारी पत्नी आणि मुलाला मीरा रोडला जायला सांगितले. पत्नी आणि मुलगा मीरा रोडला गेल्यानंतर सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मंगेशने चार वर्षांच्या मुलीला आणि आणि दीड वर्षाच्या जुळ्या मुलींना कीटकनाशक पाजले. त्यानंतर त्याने स्वत:ही कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती त्याच्या बहिणीने साकीनाका पोलिसांना कळवली. घटनास्थळी पोलिसांना चिठ्ठी मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी मंगेशची पत्नी आणि नातेवाइकांचा जबाब नोंदवून घेतला आहे.

मुंबई

मुंबई -  "महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच राहणार आहे. जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत मी इथेच राहणार आहे, दानवे पण...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

डोंबिवली - आपल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी मंडप बांधताना आड येणारा वृक्ष तोडल्याची घटना समोर आल्याने पर्यावरणप्रेमी...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

कल्याण : रेल्वे प्रवासात अनेक कॉलेजचे विद्यार्थी मोबाईल वर बोलत लोकलमधील दरवाज्यात उभे राहून प्रवास करतात स्टंटबाजी करतात, रेल्वे...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017