तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

मुंबई - कळवा स्थानकाजवळील खारेगाव रोडच्या ओव्हरब्रिजची बांधणी व नियमित देखभालीसाठी रविवारी (ता. 8) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्‍चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल. 

मुंबई - कळवा स्थानकाजवळील खारेगाव रोडच्या ओव्हरब्रिजची बांधणी व नियमित देखभालीसाठी रविवारी (ता. 8) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्‍चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल. 

मध्य रेल्वेमार्गावर ठाणे ते कल्याणदरम्यान धीम्या मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 दरम्यान दुरुस्तीचे काम रेल्वेने हाती घेतले आहे. त्यामुळे मुलुंडहून सकाळी 10.48 वाजता सुटणाऱ्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. दिवा स्थानकातून सकाळी 11.04 ते दुपारी 4.08 वाजेपर्यंत सुटणाऱ्या धीम्या किंवा सेमी जलद लोकल या मुलुंडपर्यंत जलद मार्गावर वळवण्यात येतील. या कारणाने धीम्या लोकल कळवा, मुंब्रा, कोपर, ठाकुर्ली या स्थानकांवर थांबणार नाहीत. सीएसटी स्थानकातून सकाळी 10.20 ते दुपारी 2.42 दरम्यान सुटणाऱ्या जलद लोकल या भांडुप, मुलुंड, दिवा या स्थानकांत थांबणार आहे. 

हार्बर रेल्वेमार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी - माहीमदरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कारणाने सकाळी 11.21 ते दुपारी 4.39 दरम्यान सीएसटी ते पनवेल/बेलापूर/ वाशी आणि सीएसटी ते वांद्रे/ अंधेरीदरम्यानची वाहतूक सकाळी 10.38 ते दुपारी 4.43 पर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. 

पश्‍चिम रेल्वेमार्गावर सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान जलद मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यादरम्यान सर्व लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील; तर काही लोकल रद्द असतील. 

Web Title: three routes on mega block