ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांना डेंगी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

टिटवाळा (जि. ठाणे) - कल्याण तालुक्‍याच्या ग्रामीण भागात डेंगीचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत असतानाच गोवेली येथील ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांनाच डेंगीची लागण झाली आहे. ते रजेवर गेल्यावर ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सध्या शिकाऊ डॉक्‍टर पाहत आहेत.

कल्याण तालुक्‍यातील ग्रामीण भागातील 68 गावांतील दोन लाख 60 हजार ग्रामस्थांसाठी गोवेली येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले. तेथील बाह्यरुग्ण कक्षात दररोज 90 ते 120 रुग्ण येतात. त्यापैकी सुमारे 20 रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात येतात. गेल्या महिन्यापासून थंडी-तापाच्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्यांच्या तपासणीत 11 रुग्णांना डेंगी झाला असल्याचे उघड झाले आहे. त्याचबरोबर या रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. योगेश कापूसकर यांनाही डेंगीची लागण झाली आहे.