बॅंकांची आज कसोटी

पीटीआय
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

मुंबई - ‘एटीएम’मध्ये खडखडाट असल्याने नोकदारवर्गाला गुरुवारी (ता. १) होणाऱ्या पगाराची रक्कम देताना बॅंकांची कसोटी लागणार आहे. सर्वसाधारणपणे महिन्याच्या १ तारखेला सरकारी, कॉर्पोरेट आणि खासगी कंपन्यांचे पगार कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यांत थेट जमा होतात. बॅंक खात्यात जमा होणारी रक्कम काढण्यासाठी आज बॅंकांमध्ये मोठी गर्दी उसळण्याची शक्‍यता आहे. 

सध्या बॅंक खात्यातून आठवड्याला २४ हजार आणि एटीएममधून दररोज अडीच हजार रुपये काढण्याची मर्यादा आहे. नोटाबंदी जाहीर होऊन २२ दिवस उलटले तरीही बॅंकांना पुरेशा प्रमाणात नव्या चलनी नोटांचा सुरळीत पुरवठा होऊ शकलेला नाही. त्यातच फेरबदल न झाल्याने अनेक एटीएम मशिनदेखील वापरविना बंद आहेत. त्यामुळे पगाराच्या दिवशी नोकरदारवर्ग मोठ्या संख्येने रोकड काढण्यासाठी बॅंकेत गर्दी करण्याची शक्‍यता आहे. केंद्र सरकारचे ५० लाख कर्मचारी आहेत. पगार झाल्यानंतर पैसे काढून घेण्याचे प्रमाण पाहता बॅंकांना जादा रोकड पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नव्या पाचशेच्या नोटांचीही छपाई पूर्ण क्षमतेने सुरू असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. मात्र, तरीही गुरुवारचा दिवस बॅंकांसाठी नवे आव्हान घेऊन येणार आहे.

मुंबई

विरार - मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपने मॅजिक फिगर पार करून 61 जागांवर विजयी पताका फडकवली असली, तरी त्यांच्या यशात सिंहाचा...

05.24 AM

मुंबई  - आरे कॉलनीत मेट्रोची कारशेड उभारण्याकरिता 30 हेक्‍टर जागा घेण्याचा आटापिटा सरकार करत आहे; परंतु या व्यवहारात 18...

05.12 AM

मुंबई - कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे रखडलेले निकाल कधी जाहीर करणार, याची माहिती दोन दिवसांत देण्याचे आदेश मुंबई उच्च...

04.30 AM