Heat
Heat sakal

उन्हाची काहिली विसावली ; ठाण्यात उन्हाचा पारा आला खाली

ठाणे शहरातील तापमानाने मार्च महिन्यात ४० चा पारा ओलांडला आहे.


ठाणे : ठाणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून पारा ४४.३ अंशांवर पोहोचल्यामुळे वाढलेल्या उन्हाच्या काहिलीने ठाणेकर बेहाल झाले आहेत. त्यामुळे ठाणेकर नागरिकांच्या अंगाची लाही लाही होऊ लागली आहे; तर शीतपेयाच्या गाड्यांवर नागरिक धाव घेत असतानाचे चित्र सर्वत्र दिसत आहे. शनिवारी उन्हाचा पार ४०.५ अंशावर आला आहे. वातावरणातील उन्हाची तीव्रता कमी झाल्याने ठाणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

ठाणे शहरातील तापमानाने मार्च महिन्यात ४० चा पारा ओलांडला आहे. त्यातच हे तापमान कधी कमी; तर मध्येच जास्त होते; तर १७ मार्चला तापमान ४५.६ अंशावर गेले होते. एप्रिल महिन्यातही तापमान कधी कमी; तर कधी जास्त होत असल्याचे दिसत आहे. दुपारी १.३० ते ४.३० वाजण्याच्या सुमारास सूर्य चांगलाच तळपताना दिसत आहे. १ एप्रिलपासून आतापर्यंत ठाणे शहरातील तापमान हे जवळपास ४० अंशांच्या घरात प्रामुख्याने गेल्याचे दिसत आहे. १ एप्रिल रोजी तापमान ४२.२ अंशावर गेले होते. त्यानंतर ८ एप्रिलला हेच ४१.५ अंश झाले होते. १२ एप्रिलला पुन्हा तापमान ४२.६ अंश झाले होते. १३ एप्रिल रोजी हे वाढून ४३.३ अंश इतके झाले होते. त्यानंतर तापमान ४० अंशांच्या घरात असल्याचे दिसत होते; मात्र गुरुवारी म्हणजे २१ एप्रिल रोजी हे तापमान अचानक वाढून थेट ४४.३ अंशांवर गेल्याने पुन्हा ठाणेकर नागरिकांच्या अंगाची लाही लाही होताना दिसून आली. शुक्रवारीदेखील वातावरणातील तापमान ४४.३ अंशांवरच स्थिरावले आहे. या वाढत्या तापमानाने ठाणेकर नागरिकांनी एसीत बसून थंडगार हवेत राहणे जास्त पसंत केले.

नागरिकांनी काळजी घेण्‍याचे आवाहन
अंगाची लाही लाही होऊ लागल्‍याने ठाणेकर शीतपेयाच्या गाड्यांवर धाव घेत होते. अशातच शनिवारी दुपारी १२.३० वाजण्‍याच्या सुमारास उन्हाचा पार ४१.८ अंशावर होता; मात्र तोच पारा २.३० वाजण्‍याच्या सुमारास ४०.५ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे २.३० वाजल्‍यानंतर वातावरणातील उन्हाची तीव्रता कमी झाल्याने ठाणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वातावरणातील वाढत्या उन्हाच्या काहिलीमुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
...
वातावरणातील तापमान तक्ता
वेळ कमाल किमान

९.३० ३५.३° ३०.९°
१०.३० ३७.८° ३५.३°
११.३० ४०.२° ३७.८°
१२.३० ४१.७° ४०.२°
१.३० ४१.८° ३९.६°
२.३० ४०.५° ३८.७°
३.३० ३८.९° ३७.७°

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com