जकातीचा अर्थसंकल्पाला फटका 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

मुंबई - एप्रिलपासून जकात रद्द होणार आहे. जकात हाच पालिकेच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. जकात रद्द झाल्यास पालिकेच्या अर्थसंकल्पावर मोठा परिणाम होण्याची शक्‍यता आहे. मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सादर होणाऱ्या पालिकेच्या अर्थसंकल्पावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्‍यता आहे. 

मुंबई - एप्रिलपासून जकात रद्द होणार आहे. जकात हाच पालिकेच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. जकात रद्द झाल्यास पालिकेच्या अर्थसंकल्पावर मोठा परिणाम होण्याची शक्‍यता आहे. मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सादर होणाऱ्या पालिकेच्या अर्थसंकल्पावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्‍यता आहे. 

महापालिकेला दररोज १२ कोटी रुपये इतके उत्पन्न जकातीपोटी मिळते. हे उत्पन्न एप्रिलपासून मिळणार नाही. वर्षाला सात ते आठ हजार कोटी रुपये फक्त जकातीपासून मिळणारे उत्पन्न आता पालिकेला मिळणार नाही. त्यामुळे पालिकेला जकातीचा मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. पालिकेकडे ६१ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्या ठेवी अनेक वर्षांपासूनच्या आहेत. त्या ठेवीही पालिकेचा मोठा आर्थिक आधार आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या ठेवींचा उपयोग पालिकेला करता येईल, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. पालिकेच्या तिजोरीत प्रॉव्हिडंट फंडांची; तसेच कर्मचाऱ्यांचा निधी असा एकूण निधी १० हजार कोटी रुपये जमा आहेत. पालिकेकडे पडून असलेला शिलकी निधी सुमारे ११ हजार कोटी रुपये आहे. जकात हाच पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. हा स्रोत बंद झाल्यानंतर महसूल मिळण्याचा पर्याय नाही. त्यासाठी सध्या पालिका आकारत असलेल्या विविध करांच्या वाढीचाही पालिकेला विचार करावा लागणार असल्याचे समजते.  

सरकारच्या मदतीची गरज
महापालिकेकडे सध्या ३४ हजार कोटी रुपयांचा विशेष निधी आहे. कंत्राटदारांचे ठेवींच्या स्वरूपात सुमारे सात हजार कोटी रुपये जमा आहेत. पालिकेला मालमत्ता करापोटी पाच हजार २०० कोटी रुपये मिळत आहेत. पाणी आणि मलनिःसारण करापोटी एख हजार ३०० कोटी मिळत आहेत. रस्त्यांतील चर खोदण्यासाठीच्या परवानगीपोटीही महापालिकेला मोठा महसूल मिळतो. हा महसूलही सुमारे ८५० कोटी रुपयांच्या घरात आहे. हा आधार गेल्यास पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होईल, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे पालिकेला राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी आता होत आहे.

Web Title: Toll budget hit