दिवा फास्ट लोकलसाठी उद्या शेवटचा मेगाब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

मुंबई - दिवा स्थानकात जलद लोकलला थांबा देण्यासाठी मध्य रेल्वेचा शेवटचा जम्बोब्लॉक रविवारी (ता. 23) घेण्यात येणार आहे. सीएसटीकडे जाणाऱ्या जलद मार्गावर हा नऊ तासांचा मेगाब्लॉक असेल. त्यानंतर दिवाळीपर्यंत जलद लोकल थांबवण्याचा मार्ग मोकळा होईल.

मुंबई - दिवा स्थानकात जलद लोकलला थांबा देण्यासाठी मध्य रेल्वेचा शेवटचा जम्बोब्लॉक रविवारी (ता. 23) घेण्यात येणार आहे. सीएसटीकडे जाणाऱ्या जलद मार्गावर हा नऊ तासांचा मेगाब्लॉक असेल. त्यानंतर दिवाळीपर्यंत जलद लोकल थांबवण्याचा मार्ग मोकळा होईल.

दिवा स्थानकात आतापर्यंत तीन मेगाब्लॉक घेण्यात आले आहेत. चौथा मेगाब्लॉक सीएसटीकडे जाणाऱ्या जलद मार्गावर सकाळी 9 पासून सायंकाळी 6.15 पर्यंत घेण्यात येईल. पुणे-नाशिक मार्गावरील सिंहगड, प्रगती, राज्यराणी, गोदावरी या गाड्यांच्या आठ फेऱ्या रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी-दादर दरम्यानच्या गाडीचा प्रवास पनवेलपर्यंतच होईल. या वेळेत सीएसटीकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील कल्याणहून सुटणाऱ्या लोकल धीम्या मार्गावरून धावतील. कल्याण ते ठाणेदरम्यान सर्व स्थानकांवर लोकल थांबतील. कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या सीएसटीहून सुटणाऱ्या लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्या ठाणे ते कल्याणदरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील, असे रेल्वेने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

हार्बरवर मेगाब्लॉक
हार्बर मार्गावर सीएसटी ते पनवेलदरम्यान सर्व लोकल सकाळी 11.21 ते दुपारी 4.39 पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल ते सीएसटीदरम्यान सकाळी 9.52 ते दुपारी 3.26 पर्यंत लोकल धावणार नाहीत, असे रेल्वेने कळवले आहे. त्याचपद्धतीने सीएसटी ते वांद्रे-अंधेरी दरम्यान दोन्ही बाजूच्या मार्गांवर सकाळी 10.38 ते दुपारी 4.13 पर्यंतची वाहतूक बंद राहील. या वेळेत पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष लोकल सेवा सुरू राहील.

पश्‍चिम रेल्वेवर वाहतूक बंद
बोरिवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान दुरुस्तीसाठी 22 व 23 ऑक्‍टोबरच्या मध्यरात्री विरारच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावरील वाहतूक बंद राहील. रविवारी दिवसा मेगाब्लॉक नसेल, असे पश्‍चिम रेल्वेने जाहीर केले आहे.

मुंबई

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व...

05.48 AM

मुंबई - "लिव्ह इन रिलेशनशिप' साथीदाराने दूरध्वनी न घेतल्याने तिच्या पाच...

05.33 AM

मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी मोठ्या प्रमाणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा...

05.27 AM