पर्यटनमंत्री आजपासून कोकण दौऱ्यावर

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 2 एप्रिल 2017

मुंबई - राज्य सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केले असून, या जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी करावयाच्या उपाययोजना आणि मंजूर प्रकल्पांची सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल रविवारपासून (ता. 2) तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. रावल हे विजयदुर्ग, देवगड किल्ला, कुणकेश्‍वर, मिठबाव, तोंडावली-वायंगणी येथे सी-वर्ल्ड नियोजित स्थळाची पाहणी, तारकर्ली स्कुबा डायव्हिंग केंद्र, सिंधुदुर्ग किल्ला, निवती किल्ला, सागरेश्‍वर, कुडाळ, आरवली- मोचेमाड, शिरोडा येथील नियोजित ताज हॉटेलची जागा, सावंतवाडी येथील शिल्पग्रामची पाहणी करणार आहेत. यादरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकास आराखड्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत चर्चा, तसेच सी-वर्ल्ड, गड व किल्ले विकासाबाबत लोकप्रतिनिधींच्या सूचनांवर चर्चा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाकरिता विविध विकासकामे हाती घेण्यात आली असल्याची माहिती रावल यांनी दिली.
Web Title: tourism minister on konkan tour