इब्राहिम कासकर उपचारांसाठी जेजेमध्ये दाखल, पुन्हा तुरूंगात रवानगी

ibrahim
ibrahim

मुंबई : खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इब्राहिम कासकर (वय 56) याला काल (ता. 28) रात्री सव्वादहाला ठाणे सेंट्रल जेल येथून छातीत दुखत असल्याच्या तक्रारीमुळे जेजे रुग्णालयात तपासणीसाठी आणले होते.

डॉक्टरांनी कासकर यांची तपासणी करीत औषोधोपचार केले. रुग्णाची शारिरीक स्थिती उत्तम असल्याने त्यांना परत पहाटे 3 वाजता जेल पोलिसांनी ठाण्याला नेले. या संदर्भात माहिती जेजे रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. संजय सुरासे यांनी दिली.

मुंबईत मुस्लिम धर्मियांचे रमजान महिन्यातील पवित्र रोजे सुरू असून रमजान मध्ये आपल्या कुटुंबियांसोबत काही क्षण घालवावेत या उद्देशाने तर या छातीत दुखत असल्याचा बहाणा इब्राहिम कासकरने केला तर नसावा ना, अशी चर्चा डोंगरी, मदनपुरा, मोहम्म्मद अली रोड, आग्रीपाडा येथे दबक्या आवाजात सुरू आहे. याचे कारण म्हणजे दाऊदची फॅमिली येथे वास्तव्यास आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com