ठाणे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांच्या हस्ते वृक्षारोपण, विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी

मुरलीधर दळवी 
शुक्रवार, 20 जुलै 2018

मुरबाड (ठाणे) : मुरबाड तालुक्यातील टोकावडे येथे ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांचे हस्ते गुरुवारी (ता. 19) वृक्षारोपण करण्यात आले. वनविभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमात जयवंतराव पवार महाविद्यालय व शारदा विद्यालय टोकावडे मधील विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडी काढून जनजागृती केली. 

पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लागवड करणे अत्यंत आवश्यक असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने वृक्ष लागवड मोहिमेत केलेल्या कामाचे कौतुक केले. ग्रामस्थांच्या अडचणी यावेळी पवार यांनी जाणून घेतल्या.

या प्रसंगी ग्रामपंचायत टोकावडेच्यावतीने सरपंच हिराबाई हिलम, उपसरपंच बंदू पवार ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पवार व रा.काँ.पक्षाचे सरचिटणीस प्रकाश पवार यांचे हस्ते सुभाष पवार यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनक्षेत्रपाल संजय चन्ने यांनी तर आभार वनरक्षक कपील पवार यांनी मानले. या वेळी  ठाणे जिल्हा मजुर फेडरेशनचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण पवार, मुख्याध्यापक वि.वा.यंशवंतराव यांचे सह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: tree plantation in murbaad thane