खैराची चोरी करणारी टोळी अटकेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

म्हसळा - येथील संजय खताते यांच्या जागेतील खैराची झाडे चोरून तोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला खताते यांच्या सतर्कतेमुळे शनिवारी (ता. 29) वन विभागाने अटक केली.

म्हसळा - येथील संजय खताते यांच्या जागेतील खैराची झाडे चोरून तोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला खताते यांच्या सतर्कतेमुळे शनिवारी (ता. 29) वन विभागाने अटक केली.

यामध्ये सहा अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या मुलांवर कारवाई करताना वन विभागाला कायदेशीर अडथळे येत असल्याने त्यांचा वापर होत असल्याचे तपासात उघड झाले. आपल्या जागेत काही व्यक्ती झाडे तोडत असल्याचे खताते यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत त्वरित म्हसळा येथील वन विभागाला माहिती दिली. वन विभागाचे अधिकारी घोडके यांनी घटनास्थळी येऊन झाडे तोडणाऱ्या व्यक्तींना अटक केली. या वेळी घटनास्थळावरून खैराच्या सहा झाडांचे 30 ओंडके जप्त केले. या खैरचोरीसाठी सहा अल्पवयीन मुलांचा वापर केल्याचे तपासात आढळून आले. म्हसळा तालुक्‍यात खैर तस्करांची मोठी टोळी सक्रिय असून त्यासाठी तालुक्‍यातील काही लोक खैर तोडीसाठी माणसे पुरवितात. यात बऱ्याचदा गरीब कुटुंबांतील अल्पवयीन मुलांचा वापर होतो. जेणेकरून वन विभागाने कारवाई केली तरी ही मुले अल्पवयीन असल्याने कारवाई करताना मर्यादा येतात. या घटनेबाबत तालुका वनक्षेत्रपाल पवळे यांच्याशी संपर्क साधला असता आरोपींवर गुन्हा दाखल केला असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स

मुंबई

कल्याण - नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात गेलेली मराठी कुटूंब आजही आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहेत....

06.24 PM

मुंबई : घाटकोपर येथील इमारत दुर्घटना प्रकरणाची चौकशी करून संबंधित अहवाल आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे सादर...

04.30 PM

मुंबई - वर्षभर आपले कुटुंबिय आणि देशासाठी लढणाऱ्या आपल्या पती राजांची आणि कुटुंबियांची सक्षम पणे सांभाळ करणाऱ्या त्या पत्नी...

04.24 PM