वीस वर्षांनंतर आरोपी अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

मुंबई - संगणक खरेदीत फसवणूक करणाऱ्या आरोपीला मंगळवारी 20 वर्षांनंतर जुहू पोलिसांनी अटक केली. इलियाज पटेल असे त्याचे नाव आहे. पटेल याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तक्रारदार हे विलेपार्ले परिसरात राहतात. पूर्वी ते संगणक क्‍लास चालवत होते. 18 संगणकांच्या खरेदीसाठी त्यांनी इलियाजसह तिघांना चार लाख दिले होते. जुलै ते सप्टेंबर 1995 मध्ये त्यांनी हा व्यवहार केला होता; मात्र संगणक न देताच तिघांनी पळ काढला होता. या फसवणुकीप्रकरणी त्यांनी जुहू पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यावरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला; मात्र आरोपींना अटक करण्यात अपयश आले होते.

मुंबई - संगणक खरेदीत फसवणूक करणाऱ्या आरोपीला मंगळवारी 20 वर्षांनंतर जुहू पोलिसांनी अटक केली. इलियाज पटेल असे त्याचे नाव आहे. पटेल याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तक्रारदार हे विलेपार्ले परिसरात राहतात. पूर्वी ते संगणक क्‍लास चालवत होते. 18 संगणकांच्या खरेदीसाठी त्यांनी इलियाजसह तिघांना चार लाख दिले होते. जुलै ते सप्टेंबर 1995 मध्ये त्यांनी हा व्यवहार केला होता; मात्र संगणक न देताच तिघांनी पळ काढला होता. या फसवणुकीप्रकरणी त्यांनी जुहू पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यावरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला; मात्र आरोपींना अटक करण्यात अपयश आले होते. अखेर पोलिसांनी न्यायालयात "ए समरी' दाखल केली होती. 

Web Title: Twenty years after the accused was arrested in mumbai