अल्पवयीन मुलीचे अपहरण; दोघे ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

खालापूर - मुलीला पळवून परराज्यात नेण्याचा कट रचणाऱ्या दोघा परप्रांतीयांना खालापूर पोलिसांनी अटक केली आहे.

खालापूर - मुलीला पळवून परराज्यात नेण्याचा कट रचणाऱ्या दोघा परप्रांतीयांना खालापूर पोलिसांनी अटक केली आहे.

खालापूर येथे राहणारी 13 वर्षीय मुलगी बुधवारी (ता. 18) सकाळी शाळेत गेली होती. सायंकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. शाळेत चौकशी केली असता, ती आलीच नसल्याचे सांगण्यात आले. तिच्या वडिलांना शेजारी राहणाऱ्या मोहम्मद जमीर साहब खान याचा संशय आल्याने त्याला विचारले असता, त्याचा मित्र फरमान छोटू खान (रा. उत्तर प्रदेश) याने मुलीला बीडमध्ये नेल्याचे सांगितले.

खालापूर पोलिसांत तक्रार दाखल केली असता, बीडमधून मुलीची सुटका केली. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून, मुलीला पालकांच्या हवाली केले आहे.

Web Title: two arrested in girl kidnapping case crime