अधिकाऱ्यावर डंपर घालणाऱ्यांना कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

लोणेरे - मुंबई-गोवा महामार्गावर बेकायदा वाळूची तपासणी करण्यासाठी उभे असलेले मंडळाधिकारी रवींद्र उभारे यांच्यावर सोमवारी (ता. 5) डंपर घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सत्र न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

महामार्गावर काल पहाटे तीन वाजता इंदापूरचे मंडळाधिकारी उभारे व त्यांचे सहकारी तपासणी करीत असताना हा प्रकार घडला. लोणेरे फाटा व ढालघर या ठिकाणी संशयास्पद डंपरच्या चालकाला थांबण्याचा इशारा उभारे यांच्या पथकाने केला. त्यावर चालक सागर मोहिते याने डंपर थांबवला तर नाहीच उलट तो उभारे यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. या पथकाने डंपरचा पाठलाग करून तो अडवला. मोहिते व त्याच्या साथीदाराने कर्मचाऱ्यांना धमकावून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.