दोन शासकीय कर्मचारी ठार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

मुंबई-गोवा महामार्गावर वाकेड गावाजवळ बोरथडे फाटा येथे दोन मोटारींमध्ये झालेल्या भीषण अपघातात रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील दोन कर्मचारी जागीच ठार झाले. अन्य दोघे जखमी आहेत. अपघात आज सकाळी साडेआठ वाजता झाला. मृत जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी आहेत. बदलीच्या ठिकाणी ओरोसला (सिंधुदुर्ग) हजर होण्यासाठी जाताना अपघात झाला.

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावर वाकेड गावाजवळ बोरथडे फाटा येथे दोन मोटारींमध्ये झालेल्या भीषण अपघातात रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील दोन कर्मचारी जागीच ठार झाले. अन्य दोघे जखमी आहेत. अपघात आज सकाळी साडेआठ वाजता झाला. मृत जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी आहेत. बदलीच्या ठिकाणी ओरोसला (सिंधुदुर्ग) हजर होण्यासाठी जाताना अपघात झाला.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रदीप नथुराम पिलणकर (वय 53) व सहायक रोहित मोहन मांडवकर (28) दोघे मोटारीने आज सकाळी ओरोसला चालले होते. मात्र, वाटेत चालक पिलणकर यांचे मोटारीवरील नियंत्रण सुटले आणि ती समोरून येणाऱ्या मोटारीवर आदळले. धडक एवढी जबरदस्त होती की मोटारीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. पिलणकर व त्यांच्या बाजूला बसलेले मांडवकर हे जागीच ठार झाले. 

Web Title: Two government employees killed