हॉंगकॉंगच्या दोन कंपन्या रडारवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

मुंबई - सुमारे 1500 कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी प्राथमिक तपासात हॉंगकॉंगमधील दोन कंपन्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आल्या आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी ईडीचे अधिकारी हॉंगकॉंग सरकारचीही मदत घेणार आहेत.

मुंबई - सुमारे 1500 कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी प्राथमिक तपासात हॉंगकॉंगमधील दोन कंपन्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आल्या आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी ईडीचे अधिकारी हॉंगकॉंग सरकारचीही मदत घेणार आहेत.

1478 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेतील 990 कोटी रुपये हॉंगकॉंगला पाठवल्याप्रकरणी ईडीने सोमवारी कृतिका दहाल (34) या महिलेला अटक केली. शनिवारी ती मुंबई विमानतळावर आल्यानंतर ईडीने तिला चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत लेखी समन्स बजावले. चौकशीनंतर तिला अटक करण्यात आली. न्यायालयाने दिला 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नोटबंदीच्या काळात बॅंक खात्यांमध्ये मोठी रक्कम जमा केल्यामुळे राजेश्‍वर एक्‍सपोर्ट ही हिऱ्यांचा व्यवसाय करणारी कंपनी डिसेंबरमध्ये प्रथम ईडीच्या रडारवर आली होती. या कंपनीमार्फत 92 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा विविध खात्यांत जमा करण्यात आल्या होत्या. त्यानंतर कंपनीचे मागील व्यवहार तपासले असता वर्षभरात या कंपनीच्या खात्यातून 1478 कोटी रुपये हॉंगकॉंग व दुबईला पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम पाठवण्यासाठी 10 बनावट कंपन्या व 25 खात्यांचा वापर झाला. या शेल कंपन्यांतून या 25 खात्यांमध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली, असे उघड झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

कृतिकाला किती मोबदला मिळाला?
कृतिका दहाल हिने "इंटरनॅशनल रायजिंग' ही कंपनी स्थापन करून त्या माध्यमातून 990 कोटी रुपये हॉंगकॉंगला पाठवले. या कंपनीची ती स्वतः संचालक, समभागधारक आहे. हॉंगकॉंगमधील बॅंक खातीही तिने मुख्य आरोपीच्या सांगण्यावरून उघडली. चौकशीत दहाल मदत करत नसल्यामुळे ही रक्कम पाठवण्यासाठी तिला किती मोबदला मिळला हे स्पष्ट झाले नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: two hongkong company on radar