आमची होळी, धुळवड आता संपली - उद्धव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

मुंबई - एकमेकांवर जी काही फेकाफेकी करायची ती झाली आहे. होळी, धुळवड, रंगपंचमी जे काय व्हायचे ते झाले आहे, अशा सूचक शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपबरोबरचे संबंध सुरळीत झाल्याचे सूचित केले.

तिथीनुसार बुधवारी (ता. 15) छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यानिमित्त शुक्रवारी शिवसेनाप्रणित स्थानिय लोकाधिकार समितीतर्फे फोर्ट येथे विशेष संचलन करण्यात आले. त्या वेळी ठाकरे बोलत होते. या वेळचा विजय मागच्या चार विजयांपेक्षा नक्कीच वेगळा होता. निवडणूक असो वा नसो, आमच्या हातात भगवाच राहील. आम्ही शिवरायांसमोर झुकणारे आहोत, इतर कुणासमोर नाही, असेही ते म्हणाले.

केंद्र सरकारमध्ये लवकरच दोन लाखांहून अधिक नोकऱ्या उपलब्ध होतील. त्यामुळे मला स्थानिय लोकाधिकार समितीची गरज भासणार आहे. येथे आपल्या मुला-मुलींना जास्तीत जास्त नोकऱ्या लागल्या पाहिजेत, असेही ठाकरे म्हणाले.