उद्धव ठाकरे सत्तेतून बाहेर पडणार नाहीत - चंद्रकांत पाटील

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 मे 2018

महाराष्ट्र प्रगतीपथावर असताना, उद्धव ठाकरे अशा प्रकारचा निर्णय घेऊन महाराष्ट्राला अधोगतीकडे घेउन जाणार नाहीत. तसेच त्यांनी असा निर्णय घेतल्यास शिवसेनेचाही अशा प्रकारच्या निर्णयाने तोटाच होईल असेही मत चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलाताना व्यक्त केले

मुंबई - पालघर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप युतीतील तणाव टोकाला गेलेला आहे. उद्धव ठाकरे हे पाच वाजता या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेना युतीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे हे युतीतुन बाहेर पडणार नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र प्रगतीपथावर असताना, उद्धव ठाकरे अशा प्रकारचा निर्णय घेऊन महाराष्ट्राला अधोगतीकडे घेउन जाणार नाहीत. तसेच त्यांनी असा निर्णय घेतल्यास शिवसेनेचाही अशा प्रकारच्या निर्णयाने तोटाच होईल असेही मत चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलाताना व्यक्त केले.

पालघर निवडणुकीनंतर मात्र, युती तुटण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि हीच शिवसेनेसाठी योग्य वेळ असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Uddhav Thackeray's does not break alliance says chandrakant patil