साई पक्षात इनकमिंग

ulhasnagar-municipal-corporation
ulhasnagar-municipal-corporation

उल्हासनगर - उल्हासनगरमध्ये यूडीए सशाच्या गतीने यशाचा टप्पा गाठणार असे चित्र असताना, कमी जागा मिळण्याच्या शक्‍यतेपोटी रिपब्लिकनने ऐन वेळी शिवसेनेशी हातमिळवणी केली. दुसरीकडे साई पक्षात इतर पक्षांच्या उमेदवारांनी प्रवेश करण्याचा धडाका लावला आहे.

स्थानिक भाजपने ओमीच्या हट्टाखातर रिपब्लिकनला सावत्रपणाची वागणूक दिल्याने त्यांनी शिवसेनेशी घरोबा केला. यानिमित्ताने उल्हासनगरमध्ये शिवशक्ती-भीमशक्ती एकवटली आहे.

मराठी परिसरात भाजपचा हवा तसा प्रभाव नाही. हीच स्थिती टीम ओमी आणि दोन्ही काँग्रेसची आहे. या सर्वांची व्होट बॅंक सिंधी, उत्तर भारतीय यांच्यावर आहे. कुणी नाव घ्यायला तयार नाही, तिथे सामावून घेणे दूर राहिले अशी अवस्था दोन्ही काँग्रेसची आहे. अशा स्थितीत साई पक्षाचे सर्वेसर्वा जीवन इदनानी यांनी राष्ट्रवादीचे सुकाणू हाती घेतले तरच, बुडत्यांना आधार ठरू शकतो. सुरुवातीला जीवन यांनी विचार करतो असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगितले होते. आतापर्यंत कासवगतीने चालणाऱ्या साई पक्षाच्या गळाला राष्ट्रवादी नगरसेविका आशा गुप्ता, काँग्रेस नगरसेविका कांचन लुंड, शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख शेरी लुंड, काँग्रेसचे माजी नगरसेवक तुलसी वसीटा, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका अनिता गुप्ता आदी लागले आहेत. यासोबतच माजी नगरसेविका ज्योती चैनानी यासुद्धा स्वगृही परतल्या आहेत. साई पक्षामुळे सिंधी, उत्तर भारतीय, मुस्लिम मतदार विभागले जाणार आहेत. असे चित्र असताना जीवन इदनानी राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याची शक्‍यता कमी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com