सिंध महाराष्ट्रीय समाजाच्या निवडणुकीत उल्हास पॅनलची बाजी

Ulhas panel wins Sindh Maharashtrian community elections
Ulhas panel wins Sindh Maharashtrian community elections

उल्हासनगर- देशाची फाळणी झाल्यावर पाकिस्तानातील सिंध प्रांतातून निर्वासित म्हणून उल्हासनगरात स्थायिक झालेल्या मराठी मालवणी ,बौद्ध, गुजराती, परिठ समाजाने स्थापन केलेल्या सिंध महाराष्ट्रीय समाजाची निवडणूक पार पडली. त्यात माजी शिवसेना नगरसेवक सुभाष मनसुलकर यांच्या उल्हास विकास पॅनलने बाजी मारली आहे. अध्यक्षपदी मनसुलकर विजयी झाले असून त्यांच्या पॅनलने 15 पैकी 13 जागांवर विजय संपादन केला आहे. विद्या प्रबोधन पॅनलचे अध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले शिवसेना नगरसेवक सुरेंद्र सावंत यांचा अवघ्या 3 मतांनी पराभव झाला आहे. विद्या प्रबोधन पॅनलचे दोन सदस्य कार्यकारिणीवर निवडून आले असून माजी शिवसेना नगरसेवक दिलीप मालवणकर यांच्या संपूर्ण उत्कर्ष पॅनलचा पराभव झाला आहे.

पाकिस्तानातून निर्वासित म्हणून आलेल्या मराठी मालवणी, बौद्ध, गुजराती, परिठ या बांधवांनी एकत्र येऊन उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या मराठा सेक्शन भागात 1948 मध्ये सिंध महाराष्ट्रीय समाज संस्थेची स्थापना केली.1955 मध्ये संस्थेची कायदेशीर नोंदणी झाली. उल्हास विद्यालय ही शाळा बांधली. उल्हासनगरात पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात देखील याच संस्थेने केली.

या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक धर्मादाय आयुक्तांच्या आदेशान्वये पार पडली. त्यात उल्हास विकास पॅनलचे सुभाष मनसुलकर, अध्यक्ष सुरेश परब, उपाध्यक्ष अजय गावडे सरचिटणीस मुकेश पाताडे, चिटणीस राजेश गावडे, खजिनदार या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकारीणी सदस्यपदी राजेश मयेकर, सुनिल गावडे, दत्तात्रय राऊळ, संतोष इंदूरकर, दिनेश लद्देलू, विवेक दळवी, गणेश भाटकर, दिलीप सावंत हे आठ जण निवडून आले. विद्या प्रबोधन पॅनलचे शिवसेना नगरसेवक चंद्रशेखर यादव, व उपशाखाप्रमुख राकेश कांबळी यांचा सदस्यपदी विजय झाला.

दरम्यान, ही निवडणूक प्रतिष्ठतेची करण्यात आली होती. सुरेंद्र सावंत यांनी विश्वासात न घेतल्याने काहींनी सुभाष मनसुलकर यांच्या पॅनल मधून निवडणूक लढवली. ही बाब मनसुलकर यांच्या पथ्यावर पडली. ते निवडून आले. अन्यथा विद्या प्रबोधन पॅनल विजयी झाले असते, असे बोलले जात आहे. मागच्या वर्षी पार पडलेल्या पालिका निवडणुकीत सुभाष मनसुलकर यांचा पराभव झाला होता.आता मनसुलकर यांच्या पॅनलने सिंध महाराष्ट्रीय समाज निवडणुकीत बाजी मारल्याने त्यांचे राजकारणात कमबॅक होण्याचे संकेत मिळू लागले असल्याचे मानले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com