उल्हासनगर पालिकेचा 916 कोटींचा अर्थसंकल्प

दिनेश गोगी
रविवार, 1 एप्रिल 2018

उल्हासनगर- उल्हासनगर महानगरपालिकाचा 916 कोटी 42 लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्यात खर्च उत्पन्न 916 कोटी 42 लाख,खर्च 916 कोटी 32 लाख असा 10 लाख शिलकीचा अर्थसंकल्प असल्याचे सांगण्यात आले आहे.

उल्हासनगर- उल्हासनगर महानगरपालिकाचा 916 कोटी 42 लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्यात खर्च उत्पन्न 916 कोटी 42 लाख,खर्च 916 कोटी 32 लाख असा 10 लाख शिलकीचा अर्थसंकल्प असल्याचे सांगण्यात आले आहे.

उल्हासनगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर, मुख्यलेखाधिकारी दादा पाटील यांनी स्थायी समिती सभापती कांचन लुंड यांच्याकडे 600 कोटी 92 लाख उत्पन्न व खर्च 600 कोटी 67 लाख असा 25 लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प 9 फेब्रुवारी रोजी सादर केला होता. आज स्थायी समितीने आयुक्तांच्या अर्थसंकल्पात 300 कोटींच्या वर रुपये वाढ करून 916 कोटी 42 लाख असा 10 लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे.

सुरवातीलाच शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी अर्थसंकल्पात पत्रकारांसाठी 1 कोटींची मागणी केली. नगरसेवक मनोज लासी यांनी देखील पत्रकार भवनसाठी 50 लाखाची तरतूद करावी असे पत्र आयुक्त गणेश पाटील, महापौर मिना आयलानी यांना दिले आहे. कॅम्प नंबर तीन मध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुर्णकृती पुतळ्याच्या जागी छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार असून त्यासाठी 1 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन करिता 1 कोटी, बोटक्लबच्या विकासासाठी 5 कोटी, काँग्रेस नगरसेविका अंजली साळवे यांनी प्रत्येक प्रभागात महिलांच्या बचत गटांसाठी भवन उभारण्याची व त्यासाठी 4 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अंजली साळवे यांनी उल्हासनगरातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये पूर्णवेळ डॉक्टर असावा यावरही लक्ष वेधले आहे.नगरसेवक मनोज लासी यांनी गोल मैदान, सपना गार्डन, नेताजी चौक व कैलास कॉलनी चौकात 150 फुटांचे चार राष्ट्रीय ध्वज उभारण्यात यावे व त्यासाठी 1 कोटी 20 लाख रुपये निधी देण्यात यावा अशी मागणी केली आहे.

प्रशस्त रस्ते,पायवाटा,उद्यान बगीचे यांच्या विकासासोबत महापौर,उपमहापौर,सभागृह नेते,विरोधीपक्ष नेते, नगरसेवक व प्रभाग निधी दुपटीने वाढवण्यात आला आहे. नगरसेवक निवडून आल्यापासून त्यांना दमडीही निधी देण्यात आला नसून आता निधी दुपटीने वाढवण्यात आल्याने विकासकामांना गती मिळणार असा विश्वास नगरसेवकांनी व्यक्त केला आहे. महापौर मीना आयलानी, आयुक्त गणेश पाटील,उपमहापौर जीवन इदनानी,स्थायी समिती सभापती कांचन लुंड,मुख्यलेखाधिकारी दादा पाटील यावेळी उपस्थित होते.

Web Title: ulhasnagar municipal corporation budget