उल्हासनगर पालिका 100 करोड टॅक्स वसुलीच्या समीप

Ulhasnagar MNC
Ulhasnagar MNC

उल्हासनगर : उत्पन्नाचे प्रमुख सोर्स असलेला उल्हासनगर महानगरपालिकेचा मालमत्ता विभाग 100 करोड रुपये टॅक्स वसुलीच्या समीप पोहचला आहे.एका नव्या रेकॉर्डच्या दिशेने ही आगेकूच असून तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या सोबत विद्यमान आयुक्त गणेश पाटील उपायुक्त दादा पाटील सह विभागातील टीमला त्याचे क्रेडिट जाणार आहे.

थकबाकी थकवणे ही पाचवीला पुजलेली प्रथा बड्या थकबाकीदारांनी अंगीकृत केलेली आहे.त्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांच्या संपत्या सील करण्याचा पवित्रा घेण्यात आला होता.बँकांना टार्गेट करण्यात आले होते.जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आल्या होत्या.महिला बचत गटांना घरोघरी टॅक्स पावत्या वाटप करण्याचे काम देण्यात आले होते.विशेष म्हणजे राजेंद्र निंबाळकर यांनी टॅक्स विभागातील अधिकारी,निरीक्षक यांच्या सोबत सर्व विभाग प्रमुखांना वसुलीची महत्वाची जबाबदारी सोपवलेली आहे.अभय योजने अंतर्गत थकबाकीदारांना व्याजमाफी देण्यात आल्याने त्याचा सकारात्मक प्रतिसाद वसुलीच्या रूपात मिळू लागला आहे.

अद्याप पालिकेडे 31 मार्च पर्यंत वसुलीचा कालावधी आहे.एकूण चार दिवस हातात आहेत.28 तारखेपर्यंत 94 कोटी रुपयांच्या घरात टॅक्सची वसुली झालेली आहे.शिल्लक दिवसात वसुलीचा ओघ वाढवण्यासाठी,100 कोटी रुपयांच्या समीप जाण्याकरिता, किंवा हा आकडा पार करण्याच्या उद्देशाने आयुक्त गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त दादा पाटील,कर निर्धारक व संकलक संतोष जाधव,उपकर निर्धारक जेठा ताराचंद,कर निरीक्षक अनिल खतूरानी,मनोज गोकलानी,सुखदेव बंभानी,किशोर आईलसिंघानी,उषा मोरे,तानाजी पतंगराव,डी.एल.मगर,आनंद भानुशाली,गणेश शिंदे,नारायण कुडीया,शंकर सोहंदा आणि विशेष करनिरीक्षक विजय मंगलानी ही टीम पूर्णतः कामाला लागली आहे.

मूळ वार्षिक टॅक्सची रकम सोडून सुमारे 115 ते 120 कोटींच्या आसपास थकबाकी उल्हासनगरकरांवर आहे.थकबाकीचा आकडा पूर्वी अडीचशे ते तिनशे कोटी रुपयांच्या घरात असल्याचे प्रथमदर्शनी वाटले होता.मात्र दुबार नोंदणी,प्रॉपर्टी अस्तित्वात नाहीत. अशा बाबी समोर आल्याने ह्या नोंदणी वरील 90 कोटींची थकबाकी रद्द करण्यात यावी.असा प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर केला जाणार.यंदा थकबाकी पैकी 35 कोटींच्या जवळपास वसुली झालेली आहे.त्यामुळे थकबाकीचा आकडा 70 कोटी रुपये असून पुढील वर्षात अर्थात एप्रिल महिन्याच्या नंतर ही थकबाकी वसूल करण्यासाठी पालिका कंबर कसणार.असे उपायुक्त दादा पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com