मैदानातील खडीवरच फुटबॉल सामने

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

उल्हासनगर - उल्हासनगर महापालिकेतर्फे झालेल्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत खेळाडूंना मैदानातील खडीवरच खेळावे लागले. याचा त्यांना त्रास झाला. ढिसाळ नियोजनामुळे खेळाडूंना चक्क रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या खडीवर सामने खेळावे लागले. 

उल्हासनगर महापालिकेच्या क्रीडा सांस्कृतिक सभापती सविता तोरणे-रगडे आणि महापालिका प्रशासन यांनी पुढाकार घेऊन सुब्रोतो मुखर्जी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा भरवली होती. सोमवारपासून (ता.२४) हे सामने व्हीटीसी मैदानात खेळवले गेले. मंगळवारी ही स्पर्धा संपली. दरम्यान, या स्पर्धेसाठी पालिका प्रशासनाने मैदानातील खड्डे आणि पाण्याचे डबके बुजिण्यासाठी खडीचा वापर केला. मैदानात ठिकठिकाणी खडी टाकली गेली होती. मध्यम आकाराची ही खडी धारदार असल्यामुळे अनेक खेळाडूंना इजा झाली आहे. याबाबत खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

अत्यंत घाईघाईने मैदानावर खडी टाकण्याचा हा निर्णय घेतला होता. त्यामुळे खेळाडूंची गैरसोय झाली.
- सविता तोरणे-रगडे, सभापती, क्रीडा सांस्कृतिक विभाग