उल्हासनगरात 30 अतिधोकादायक, 359 धोकादायक इमारती

दिनेश गोगी
शुक्रवार, 16 जून 2017

उल्हासनगर - दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उल्हासनगर पालिकेने अतिधोकादायक, धोकादायक इमारतींच्या याद्या जाहिर केल्या आहेत. त्यात 30 अतिधोकादायक, 359 धोकादायक इमारतींचा समावेश आहे. या पार्श्‍वभूमीवर संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी अतिधोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसा बाजावण्यात येणार आहेत. याबाबत पालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर, शहर अभियंता राम जैसवार यांनी माहिती दिली.

उल्हासनगरात एकूण चार प्रभागाची रचना करण्यात आली आहे. त्यानुसार प्रभागनिहाय इमारतींची यादी तयार करण्यात आली आहे. अतिधोकादायक इमारतीत ज्या जर्जर झालेल्या व कोसळण्याच्या स्थितीत आहेत अशा इमारतींचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, अलका पवार, अजित गोवारी,मनिष हिवरे, कनिष्ठ अभियंता तरुण सेवकानी, महेश सितलानी, अश्विनी आहूजा, परमेश्वर बुडगे, विनोद खामितकर यांना देण्यात आल्या आहेत. प्राप्त होणाऱ्या अहवालानुसार इमारतीखाली करण्याची प्रक्रिया हाताळली जाणार आहे.नागरिकांनी मज्जाव केल्यास पोलिस संरक्षणाचा आधार घेण्यात येणार आहे. जीवितहानी टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

धोकादायक इमारतींपैकी काही इमारतींची दुरुस्ती सदनिका धारकांनी केली असल्यास तसा रिपोर्ट पालिकेकडे सादर करणे बंधनकारक आहे.यासोबतच इमारतींचे स्ट्रक्‍चर ऑडिट केले नसल्यास ते वास्तुविशारदा करवी आवर्जून करावे. तशी माहिती पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला द्यावी.असे राजेंद्र निंबाळकर,राम जैसवार यांनी सांगितले.

या अतिधोकादायक इमारती पालिकेने पाडल्या
चार वर्षापूर्वी गोल मैदान परिसरातील अतिधोकादायक शिशमहल या पाच इमारतीचे आतील स्लैब कोसळले होते.त्यात सहा जण दगावले होते.त्यानंतर हि संपूर्ण इमारत जमीनदोस्त करण्यात आली होती.पुढील दोन तीन वर्षात पालिकेने झुलेलाल टॉवर, स्वामी शांतिप्रकाश मार्केट,महालक्ष्मी टॉवर, मिनाक्षी अपार्टमेंट, साई आशाराम अपार्टमेंट,पंचशील अपार्टमेंट आदी इमारतीं खाली करुन पाडलेल्या आहेत.यावेळेस पहिली कोणती इमारत खाली करुन पाडली जाते.याकडे उल्हासनगरकरांचे लक्ष लागले आहे.

■ ई सकाळवरील महत्वाच्या बातम्या
'बॅकअप' पृथ्वीवरील मानवी अस्तित्वाचा!
ट्विटरवरून अभिनेते ऋषी कपूर यांची पाक क्रिकेटवर टीका
पाऊस सुरू झाल्याने मेंढपाळ परतीच्या मार्गावर...
अभिनेत्री रीमा यांच्या वाढदिनी सिनेसृष्टी वाहणार आदरांजली
रेल्वे तिकीटावरून घरफोडीचे आरोपी पकडले
पतंगराव लढणारच...पण कुठे?
नियम धाब्यावर... विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात....
कंधार तालुक्यातील साडेतीन हजार विद्यार्थ्यांचे अस्तित्व धोक्यात

पुण्यात पाऊस !